शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

तिकडे यात्रेतून ‘संघर्ष’, इकडे भोजनासोेबत विचार विमर्श

By admin | Published: April 08, 2017 12:31 AM

नाशिक : जिल्हा परिषदेतील भाजपा-राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या सदस्यांनी मंत्र्यांनी बोलविलेल्या स्नेहभोजनास हजेरी लावल्याने शिवसेना-माकपाने त्यांच्यावर टीका केली आहे.

 नाशिक : एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभर फिरून संघर्ष यात्रा काढून राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे नेते सरकारविरोधात आवाज बुलंद करीत असताना दुसरीकडे मात्र नाशिक जिल्हा परिषदेतील भाजपा-राष्ट्रवादी आणि फुटीर कॉँग्रेसच्या सदस्यांनी भाजपाच्या मंत्र्यांनी बोलविलेल्या स्नेहभोजनास हजेरी लावल्याने शिवसेना-माकपाने त्यांच्यावर टीका केली आहे.नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या फुटीर सदस्यांनी बहुमत जमवित चार विषय समित्यांवर कब्जा केल्याने शिवसेना-कॉँग्रेस, माकपाचा तिळपापड होत असून, भाजपा-राष्ट्रवादी कॉँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना-कॉँग्रेस व माकपा सोडत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (दि. ७) मुंबईला सह्णाद्रीवर नवनियुक्त भाजपा-राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच निवडून आलेल्या सर्वच सदस्यांना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सायंकाळी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते. या स्नेहभोजनाआधी भाजपा-राष्ट्रवादी तसेच फुटीर कॉँग्रेसच्या सदस्यांचा ओळख परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करून देण्यात येणार होता. या स्नेहभोजनासाठी भाजपासोबतच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्व सदस्य व दोघे पदाधिकारी तसेच कॉँग्रेसच्या फुटीर तीनही सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी भाजपासोबत राष्ट्रवादीचे बहुतांश सदस्य व दोघे पदाधिकारी, कॉँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यासह तीनही सदस्यांनी हजेरी लावली. त्यामुळे विरोधकांना आयतीच संधी मिळाली. राज्यभरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे नेते पायी फिरून संघर्ष यात्रा काढत आहेत. दुसरीकडे याच राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या नाशिक जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांनी भाजपा मंत्र्यांनी बोलविलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आणि त्यांच्याच वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला हरताळ फासल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच याबाबत राष्ट्रवादीच्या व कॉँग्रेसच्या वर्तुळात या स्नेहभोजनाची चर्चा आहे. (प्रतिनिधी)