निफाड : तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरिपाच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे असल्याचे सध्याचे चित्र आहे. तालुक्यात खरिपाची सोयाबीन, मका, बाजरी ,तूर, मूग, उडीद ,भुईमूग आदी पिके घेतली जातात. यावर्षी सोयाबीनच्या पेरणीचे उद्दिष्ट्य १६९९३ हेक्टर प्रस्तावित आहे, त्यापैकी १७७४० क्षेत्रांत सोयाबीन पेरणी झाल्याने ही पेरणी उद्दिष्टापेक्षा जास्त झाली आहे. मका पिकाच्या पेरणीचे उद्दिष्ट १३९८४ हेक्टर प्रस्तावित आहे, परंतु मक्याची पेरणी १३१३६ हेक्टर क्षेत्रांत झाली आहे.
उसाची लागवड उद्दिष्ट्य क्षेत्र ५७०२ हेक्टर आहे. आतापर्यंत ६२०५ हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड पूर्ण झाली आह. बाजरी पिकाच्या पेरणीचे उद्दिष्ट ३६८ हेक्टर प्रस्तावित आह. त्यापैकी ७६.२० हेक्टर क्षेत्रात बाजरीची पेरणी झाली आहे. तर भुईमूग पिकाच्या पेरणीचे उद्दिष्ट ६३६ हेक्टर प्रस्तावित आहे. त्यापैकी २९४ हेक्टर क्षेत्रात भुईमूग पेरणी झाली आहे. तूर पिकाच्या पेरणीचे उद्दिष्ट २३५.८० हेक्टर आहे. त्यापैकी १०८.८० हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आह. मुगाचे पेरणीचे उद्दिष्ट १५५२ हेक्टर प्रस्तावित आह. त्यापैकी २०७.७० हेक्टर क्षेत्रात मुगाची लागवड झाली आह. उडीद पिकाच्या पेरणीचे उद्दिष्ट ३०२ हेक्टर प्रस्तावित आह. त्यापैकी १०७.४० हेक्टर क्षेत्रात उडीद लागवड झाली आहे. कापूस पिकाच्या पेरणीचे उद्दिष्ट ५७ हेक्टर प्रस्तावित आहेत् यापैकी ३३ हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली आहे. या तालुक्यात २१३५ हेक्टर क्षेत्रात चारा करण्यात आला या तालुक्यात ४७३० हेक्टर क्षेत्रात भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. भाजीपाला लागवडीकडे या तालुक्यात कल वाढत आहे. मागील वर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने आणि विहिरी, कूपनलिका यांची पातळी बऱ्यापैकी टिकून आहे. तालुक्याचे जे खरिपाचे निर्धारित क्षेत्र आहे. त्यापेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रात काही पिके सोडली तर खरिपाची पेरणी झाली आहे.
-------------------------
उद्दिष्टांपेक्षा अधिक ऊस लागवड
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये पावसाने वेळेवर हजेरी लावलेली आहे, मात्र म्हणावा तितका पाऊस आजपर्यंत न झाल्याने व मधून मधून विश्रांती घेत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या तालुक्यात ऊस पिकाला प्राधान्य दिले जाते. यावर्षी उद्दिष्टांपेक्षा जास्त क्षेत्रात ऊस लागवड झाली आहे या खरीप हंगामात सध्या पेरणी केलेल्या सोयाबीन पिकासाठी कमी प्रमाणात का होईना पोषक पाऊस पडत आहे.
----------------------
दमदार पावसाची प्रतीक्षा
या वर्षी सोयाबीनचे बियाणाची टंचाई भासल्याने हे बियाणे मिळवताना शेतकऱ्यांची धावपळ उडाली. बऱ्याच शेतकऱ्यांना ज्या कंपनीचे बियाणे पाहिजे ते मिळू शकले नाही. काही शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे विकत घेऊन पेरणी केली. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली, मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारली अशा शेतकऱ्यांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली. यात उत्पादन खर्च वाढला गेला सोयाबीन बरोबरच या तालुक्यात मका पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मका पिकाची पेरणी, उत्पादन खर्च, मका पिकाला मिळणारा भाव याचा विचार करता हे परवडेल असे पीक असल्याने मका क्षेत्रात वाढ झाली आहे. असे असले तरी या तालुक्यात म्हणावा तितका पाऊस न झाल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.