महापालिकेच्या पूर्व विभागात प्रभाग १४, १५, १६ ते १३ व ३० असे एकूण पाच प्रभाग आहे या प्रभागांमध्ये जुने नाशिक द्वारका भाभानगर शिवाजी वाडी दीपालीनगर, भारतनगर, इंदिरानगर, परबनगर, कमोदनगर, राजीवनगर, सुचितानगर, साईनाथनगर, डीजीपीनगर क्रमांक एक, गांधीनगर, वडाळा गावसह परिसर येतो. त्यामधील विविध उपनगरांमध्ये कॉलनी व सोसायटी दिवसागणिक वाढत आहे त्याचबरोबर सदनिका व बंगल्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे महापालिकेच्या पूर्व विभागात गेल्या पाच वर्षांपूर्वी ३१ एप्रिल २०१७ पर्यंत ७८ हजार सत्तावीस घरपट्टीचे मिळकत धारक होते ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत ८५ हजार ८८९ घरपट्टीचे मिळकतधारक आहेत गेल्या पाच वर्षात ७८६५ घरपट्टीचे मिळकतधारक वाढले तसेच पाच वर्षांपूर्वी ३१ एप्रिल २०१७ पर्यंत पाणी बिल नळकनेक्शन संख्या २६ हजार ३७६ होती, तर ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत २८ हजार बारा अशी पाणी बिल नळ कनेक्शन संख्या आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात पाणी बिल नळकनेक्शन २०३६ ने वाढले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पूर्व विभागाच्या महसुलात लाखो रुपयांनी वाढ झाली आहे.
पाच वर्षात मिळकतधारकांमध्ये झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:12 AM