कुपोषणावर न्युट्रीशियनची मात्रा
जिल्हा नियोजन मंडळाने कुपोषण निर्मूलनासाठी सहा कोटी रुपयांचा निधी दिला असून, सर्वसाधारण सभेने या विषयाला मंजुरी दिली आहे. युनिसेफने कुपोषित बालकांना न्युट्रीशियनचा प्रयोग करून त्या माध्यमातून कुपोषित बालकांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला आहे. हाच प्रयोग नाशिक जिल्ह्यातही राबविण्यात येणार असून, सुमारे अडीच हजार बालकांना नवीन वर्षात न्युट्रीशियनची मात्रा मिळणार आहे.
------
नवीन इमारतीची मुहूर्तमेढ
जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून, या इमारतीच्या उभारणीचा कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. नवीन वर्षात या इमारतीचा पायाभरणी समारंभ होऊन कामाला सुरुवात होईल. जिल्हा परिषद प्रशासन, पदाधिकारी, सदस्यांची अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती होईल.
-------
प्रशिक्षण, व्यवसायाला प्रारंभ
महिला व बाल कल्याण विभागातर्फे नवीन वर्षात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाबरोबरच, त्यांना व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन व कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल.