कळवण : कळवण विधानसभा मतदारसंघातून माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व भाजपचे सुरगाणा तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी माघार घेतल्याने रिंगणात ६ उमेदवार उतरले असून, मतदारसंघात खऱ्या अर्थाने चौरंगी लढत होणार आहे. मागील निवडणुकीत सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते.मतदारसंघात माकपचे विद्यमान आमदार जे. पी. गावित, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार, शिवसेनेचे मोहन गांगुर्डे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. भाजपकडून इच्छुक असलेले भाजप आदिवासी आघाडीचे राजेंद्र ठाकरे यांनी युती विरोधात बंडखोरी करून मनसेकडून उमेदवारी दाखल केली आहे. कळवण तालुक्यातील १४५६२३ मतदार असून, सुरगाणा तालुक्यातील १३५३२२ मतदार आहेत.मागील निवडणुकीत कळवण तालुक्यातून मतविभागणीचा फटका माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांना बसला होता. त्यामुळे पवारांना पराभवाचे धनी व्हावे लागल्याचे शल्य कळवण तालुक्यातील मतदारांना पाच वर्ष बोचले. गत पाच वर्षात तालुक्यात अनेक समस्यांनी डोकं वर काढले असून, तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची दुर्दशा, दोन वेळा भूमिपूजन होऊनदेखील काम झालेले नाही.कळवण शहरातील प्रमुख रस्त्यावर गेल्या पाच वर्षांपासून पडलेले खड्डे, पुनंद प्रकल्पातून सटाणा शहर पाणीपुरवठा योजनेला मंजुरी, ओतूर धरणाला मंजुरी मिळवूनदेखील दुरु स्तीचे ठप्प झालेले काम हे विषय या निवडणुकीत चर्चेच्या अग्रस्थानी आहे.रिंगणातील उमेदवार...जिवा गावित (माकप), नितीन पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), मोहन गांगुर्डे (शिवसेना), राजेंद्र ठाकरे (मनसे), विजय भोये (भारतीय ट्रायबल पार्टी ), वामन बागुल (अपक्ष)२०१४ मध्ये होते ७ उमेदवार । यंदा आहेत एकूण ६ उमेदवार
कळवणमध्ये होणार चौरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 1:12 AM