आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे वापरण्यावर भर द्यावा. सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त उगवण झाल्यास घरगुती बियाणे वापरणे फायदेशीर ठरेल. त्यासाठी मागील वर्षीचे शिल्लक सोयाबीन बियाणे या वर्षी
वापरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता तपासावी, असे आवाहन कृषी अधिकारी कारभारी नवले
यांनी केले आहे.
कृषी विभागातर्फे सोयाबीन क्षेत्र असलेल्या गावांमध्ये प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. येवला तालुक्यातील येवला, पाटोदा, अंदरसुल या कृषी मंडळातील सोयाबीन बहुल क्षेत्र असणाऱ्या गावांमध्ये
शेतकऱ्यांकडे मागील वर्षी शिल्लक असणारे बियाणे यावर्षी वापर करण्यापूर्वी सदर बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी करून पेरणी करावी, यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. उगवण क्षमता तपासणी केली असता, टक्केवारी समजून दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरता येते. मंडळातील जळगाव नेऊर, देशमाने, मुखेड, नेऊरगाव पिंपळगाव लेप, पाटोदा, सातारे, एरंडगाव, धुळगाव आदी गावांमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडल अधिकारी जे. आर .क्षीरसागर, कृषी पर्यवेक्षक बी. के. नाईकवाडी, कृषी सहायक राहुल जगताप मार्गदर्शन करत आहेत.
कोट....
मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता सोयाबीन बियाण्याची
टंचाई भासू नये याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मागील वर्षी पेरलेले घरगुती चांगल्या प्रतीचे बियाणे या हंगामात वापरावे. पेरणीसाठी वापरात येणाऱ्या बियाण्यांची उगवणक्षमता चाचणी करून घ्यावी.
- कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी, येवला