शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

साठ फुटीचा रस्त्याचा श्वास कधी होणार मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 4:51 PM

सटाणा : शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याला समांतर म्हणून साठ फुटी रस्ता तयार करण्यात आला आहे. या साठ फुटी रस्त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे. परंतु यारस्त्यावर लोकप्रतिनिधींचे अतिक्र मक असल्यामुळे रस्त्याचे काम ठप्प आहे. नगराध्यक्षांनी हे अतिक्र मण काढण्याची हिंमत दाखविल्यास हा रस्ता थेट मालेगाव रस्त्याला जोडला जाणार आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी दूर होण्याबरोबरच शहर विकासाचा मार्ग देखील मोकळा होणार आहे.

ठळक मुद्देसटाणा शहरातील अतिक्र मण म्हणजे नगराध्यक्षापुढे मोठे आव्हान

सटाणा : शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याला समांतर म्हणून साठ फुटी रस्ता तयार करण्यात आला आहे. या साठ फुटी रस्त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे. परंतु यारस्त्यावर लोकप्रतिनिधींचे अतिक्र मक असल्यामुळे रस्त्याचे काम ठप्प आहे.नगराध्यक्षांनी हे अतिक्र मण काढण्याची हिंमत दाखविल्यास हा रस्ता थेट मालेगाव रस्त्याला जोडला जाणार आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी दूर होण्याबरोबरच शहर विकासाचा मार्ग देखील मोकळा होणार आहे.साठफुटी रस्ता काही बड्या हस्तींनी अतिक्र मण करून अडविल्यामुळे अक्षरशा शहराचा श्वास दाबून धरला आहे. बायपास रखडल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्र मण काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नगररचना विभाग आणि पालिका प्रशासनाने अतिक्र मण धारकांना मोबदला घेऊन गाशागुंडाळला, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची अशी भूमिका घेत प्रशासनाने अनेकवेळा अल्टिमेटम दिला होता. मात्र अडीच वर्ष उलटूनही पालिका प्रशासनाने अद्याप कारवाई न केल्याने शहरवासियांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.शहरामधून जाणाºया विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावर वाढत्या अपघातामुळे अनेक निष्पापांचे बळी गेल्याने बायपासचा प्रश्न ऐरणीवर आला असून या मागणीसाठी सटाणा वकील संघाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याला तात्पुरता पर्याय म्हणून आता पालिका प्रशासन आणि नगररचना विभागाने साठ फुटीचा मार्ग अवलंबला आहे. वकील संघाच्या इशाºयामुळे पालिका प्रशासनाने अतिक्र मण धारकांच्या अनेक वेळा बैठका घेतल्या.वाढीव चटईक्षेत्र, विकास हस्तांतरण हक्क, आर्थिक मोबदला असे तीन पर्याय अतिक्र मण धारकांपुढे ठेवले या तिनही पर्यायांपैकी एकपर्याय निवडून अतिक्र मण काढून शहरविकासाला हातभार लावा असे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी करून अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशाराही दिला.दरम्यान पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे साठ फुटी रस्त्याचे काम रखडले आहे. हा रस्ता मोकळा न केल्यास मी पालिका प्रशासनाविरु द्ध आंदोलन पुकारू असा इशारा एका माजी आमदारांनी देखील दिला होता. मात्र ना कोणाला आंदोलनाची आठवण राहिला, ना पालिका प्रशासनाने अतिक्र मण हटवण्याची हिंमत दाखवली. पालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून साठ फुटीचा विकास रखडला आहे. परिणामी मार्ग रोखून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे.या रस्त्यावरील वाढत्या अपघातामुळे वेळोवेळी बायपास प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र आता बायपास होईल तेव्हा होईल, साठ फुटी रस्त्याचा मार्ग मोकळा करा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.पं. ध. पाटील नगरात काही बंगल्यांच्या बांधकामांना पालिकेने परवानगी दिल्यामुळे या रस्त्याचा विकास कोर्टकचेरीतच अडकला. कोर्टातही पालिकाप्रशासनावर नामुष्कीची वेळ आली. हे प्रकरण मिटत नाही तोच या रस्त्यावर चौगाव रोड नजीक तेरा जणांनी पक्की बांधकामे करून पूर्णपणे रस्ता आडवला आहे. हा रस्ता नामपूर रोड ते शिवाजीनगर पर्यंत विकिसत करण्यात आला आहे. मात्र या तेरा जणांच्या अतिक्र मणामुळे हा समांतर रस्ता अद्यापही मालेगाव रोडला जोडता आलेला नाही याबाबत अनेक वेळा विविध संघटना तसेच नगरसेवकांनी देखील आवाज उठवून साठ फुटी रस्त्याचा श्वास मोकळा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र राजकीय दबावापुढे पालिका प्रशासनाने वेळोवेळी गुडघे टेकण्याचे काम केल्याचे दिसून येते.