नाशिक : सर्वच शासकीय कार्यालये नियमितपणे सुरू झाली असून, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने शासकीय कार्यालयांसाठी काही उपाययोजना सुचविल्या असून, त्यात प्रामुख्याने प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांचे तपमान दररोज थर्मल स्कॅनरने तपासूनच प्रवेश देण्याबरोबरच प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.या संदर्भात शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांमध्ये शासकीय कार्यालयातील सर्व खिडक्या पुर्णपणे उघडाव्या, कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान तीन फूट अंतर असावे त्यासाठी आवश्यक असेल तर कार्यालयातील बैठक व्यवस्थेत फेररचना करावी, कार्यालयात येणा-या अभ्यागतांना मास्क असणे अनिवार्य करण्यात यावा, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची तसेच प्रत्येक स्वच्छतागृहात साबण, हॅण्डवॉशची व्यवस्था करावी, कार्यालयात नियमित वापर करण्यात येणा-या वस्तू दिवसातून तीन वेळा स्वच्छ पुसून घ्यावेत. कार्यालयातील संगणक, प्रिंटर, स्कॅनर दिवसातून दोन वेळा स्वच्छ पुसून घ्यावेत या वस्तुंचे निर्र्जंतूकीकरण ७० टक्के अल्कहोल असलेल्या सॅनिटायझरने करण्यात यावे, कार्यालय नियमितपणे साबण व पाण्याने स्वच्छ धुवून घेण्यात यावे.कार्यालयाच्या वापराबरोबरच कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घ्यायवयाच्या खबरदारीबाबतही शासनाने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. त्यात एकाच वाहनातून अनेक अधिकारी, कर्मचाºयांनी प्रवास करू नये, ई-आॅफिसचा जास्तीत जास्त वापर करावा, फाईल्स ई-मेलद्वारे पाठवाव्या, कमीत कमी अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश द्यावा, कार्यालयीन बैठकीसाठी अधिकारी, कर्मचा-यांना प्रत्यक्ष बोलवूनये त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरसिंगचा वापर करावा, एकाच कामासाठी अनेक व्यक्तींना न एकत्र न बोलविता दोन-तीन व्यक्तींचे लहान गट करावेत.कार्यालयीन सर्व प्रकारच्या खबरदारी घेवूनही जर कार्यालयातील कर्मचारी, अधिका-याला संसर्ग झाल्यास काय उपायोजना योजाव्यात त्याबाबतही शासनाने मार्गदर्शन केले आहे. त्यात ताप १००.४ डिग्रीपेक्षा अधिक असल्यास त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करावे, अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कर्मचारी, अधिकाºयास १४ दिवस कार्यालयात येवू देवू नये, अशा कर्मचारी, अधिका-याचा संपर्क आलेल्यांची हाय रिस्क, लो रिस्कची यादी तयार करावी व त्याबाबत खबरदारी घ्यावी अशा सुचनाही करण्यात आल्या आहेत.