शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

औष्णिक विद्युत केंद्र ‘व्हेंटिलेटर’वर !

By admin | Published: April 19, 2017 1:56 AM

एकलहरा येथे दोनच युनिट कार्यरत : शिवसेना राबविणार अभियान

नाशिक : गेल्या साडेचार दशकापासून नाशिकची ओळख बनून राहिलेल्या एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राचे पाचपैकी फक्त दोनच युनिट कार्यरत असून, तेसुद्धा कधीही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. व्हेंटिलेटरवर असलेल्या एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राचे प्राण कंठाशी आले असताना सरकारकडून मात्र नव्याने मंजूर केलेला ६६० मेगावॅटचा वीजप्रकल्प उभारण्यास टाळाटाळ केली जात आहे. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रच नाशिकच्या नकाशावरून पुसून टाकण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला असून, त्यासाठी नाशिककरांमध्ये जागृती करण्यासाठी विद्युत केंद्र बचाव अभियान राबविले जाणार असल्याचे सेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बोरस्ते यांनी सांगितले, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रातील १४० मेगावॅटचे दोन युनिट जून २०११ मध्येच बंद करण्यात आले आहेत. एकलहरे याठिकाणी राज्य सरकारकडून नव्याने ६६० मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यात येणार होता. परंतु, राज्य सरकारने परळी येथे २५० मेगावॅटचे ३, पारस येथे २५० मेगावॅटचे २, भुसावळ येथे ५०० मेगावॅटचे २, कोराडी येथे ६६० मेगावॅटचे ३, चंद्रपूर येथे २७०, ५०० आणि ६६० मेगावॅटचे ३ आणि खापरखेडा येथे ६६० मेगावॅटचा १ याप्रमाणे नवीन प्रकल्प मंजूर करताना नाशिकला मात्र वगळले आहे. एकलहरे येथील एकेक युनिट बंद पडत असताना नवीन युनिट आणण्याबाबत मात्र टाळाटाळ केली जात आहे. मुळात एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राची सुमारे ४७४ हेक्टर जागा आहे. मुबलक पाणी आहे शिवाय जवळच कोळसा वाहतुकीसाठी समुद्रकिनाराही आहे. सर्व गोष्टी अनुकूल असताना एकलहरे याठिकाणी नवीन युनिट करण्यास विलंब लावला जात आहे. एकलहरे येथील केंद्राच्या चिमणीची उंची २८० मीटरची असल्याचे सांगत संरक्षण खात्याच्या हरकतीचा मुद्दा पुढे केला जात आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांत गांधीनगर विमानतळावरून विमानांची उड्डाणे झालेली नाहीत. एकलहरे येथील केंद्र बंद पडल्यास खासगी वीज कंपनींवर अवलंबून राहावे लागणार आहे. शिवाय, त्यावर अवलंबून असलेले सुमारे १० हजार कुटुंबे उद्ध्वस्त होतील. रोजगारावर गंडांतर येईल. याशिवाय, राखेमुळे जमीन नापीक झाल्याने तिचाही पुनर्वापर होणार नाही. सद्यस्थितीत केंद्रातील युनिट ४ आणि ५ सुद्धा अखेरची घटका मोजत आहे. त्यांचे आयुष्य संपलेले आहे. त्यामुळे शासनाने केंद्र बंद पडण्याच्या आत नवीन ६६० मेगावॅटचा प्रकल्प नाशकात आणावा, अशी मागणीही बोरस्ते यांनी केली आहे. (प्रतिनिधी)