महानगरासह जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार तसेच कार्यालयातील कर्मचारी आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात टेम्परेचर गनसह सर्व अत्यावश्यक उपकरणांची सज्जता करण्यात आली आहे.थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील तापमानाची खात्री करूनच एकेकाला आत जाऊ देण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.-----------------आवारात बॅरिकेडिंगजिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यांवर बॅरिकेडिंंग करून अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. प्रांत कार्यालयाकडे जाणाºया मार्गावर लोखंडी बॅरिकेड्स टाकण्यात आले आहेत.जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय परिसर संपूर्णपणे लोखंडी बॅरिकेड्सने बंदिस्त करण्यात आला आहे.सर्वच कक्ष कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर दोरी बांधून मार्ग निषिद्ध करण्यात आला आहे.--------------------कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटायझर ठेवण्यासाठी स्टॅण्ड लावण्यात आले आहे.प्रत्येक कक्षात अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये स्वतंत्रपणे हॅण्ड सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे.निवासी उपजिल्हाधिकाºयांच्या कार्यालयात डिस्टन्सिंग व स्टॅण्ड लावण्यात आले आहे.कार्यालयात येणाºया प्रत्येकाचे नाव प्रवेशद्वारावरील रजिस्टरवर नोंदवून घेतले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाबाबत दक्षता प्रवेशद्वारावर थर्मल टेस्टिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:43 PM