ओझर : सुखोई विमान दुर्घटनेमध्ये ज्या व्यक्ती बालंबाल बचावल्या आहेत, त्या अद्यापही या अपघाताच्या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्यांना मानसिक आधार देऊन या धक्क्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.योगेश निफाडे यांच्या द्राक्षबागेत ही दुर्घटना घडली त्याच बागेच्या दुसऱ्या टोकाला त्यांचे भाऊ श्यामराव काम करीत होते. विमानाचा काही भाग उडून त्यांना लागल्याने ते अजूनही अंथरूणामध्ये पडून आहेत. डोळे उघडताच त्यांना फक्त आगीचे लोळ असल्याचा भास होतोय. मुख्य विमानाचा सांगाडा पडला त्याच्या दोन्ही बाजूस अवघ्या शंभर फुटांवर राजेंद्र रसाळ व निवृत्ती जगताप यांची घरं आहेत. जगताप यांच्या घरात आठ माणसे होती तर ढोमसे यांच्या घरात पाहुणे मिळून सोळा जण गप्पांमध्ये रंगलेले होते. काही जण ओट्यावर उभे असतानाच त्यांनी विमानाचा स्फोट पाहिला. यानंतर लहान मुलांना बरोबर घेत ते सैरावरा पळत सुटले. घरात स्वयंपाक करीत असलेल्या महिलांना जोरदार बसलेला हादरा व त्यापाठोपाठ जमिनीवर जोरात कोसळलेल्या भांड्यांचा आवाज ऐकून कानठळ्या बसल्या. यामुळे सगळेच प्रचंड घाबरले होते.या घटनेत सगळ्यात नशीबवान ठरले ते म्हणजे संतोष रेहेरे व आशा रेहेरे हे जोडपे. विलास निकम यांच्या शेतात ते फवारणी करीत होते. ती आटोपून ट्रॅक्टर शेतातून शेडमध्ये लावता क्षणी त्याच ठिकाणी स्फोट झाला. यामुळे संपूर्ण शरीराचा थरकाप होणाºया संतोष रेहेरे यांना जवळपास वीस लोक शांत करीत होते. विमान कोसळल्यानंतर स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की, प्रत्यक्षदर्शींना पूर्वपदावर यायला कित्येक तास लागले. या सर्वांचे नशीब बलवत्तर म्हणूनच ते बचावले.
‘ते’ सावरलेले नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:59 AM
ओझर : सुखोई विमान दुर्घटनेमध्ये ज्या व्यक्ती बालंबाल बचावल्या आहेत, त्या अद्यापही या अपघाताच्या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्यांना मानसिक आधार देऊन या धक्क्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ठळक मुद्देसुखोई दुर्घटना : वेळ आली होती; पण...