नाशिक : मनात असलेली जिद्द अन् देशसेवेच्या घेतलेल्या ध्यासापोटी अंगावर खाकी मिरवत ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेत ६८८ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी उगवत्या दिनकराच्या साक्षीने न्यायपूर्वक व्यवहार व कर्तव्यपालनाची शपथ ग्रहण केली. निमित्त होते, महाराष्ट पोलीस प्रबोधिनीच्या ११७व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचे.महाराष्टच्या मातीत गिरविले धडेगोवा पोलीस दलातील २० पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी येथील पोलीस अकादमीत फौजदाराचे धडे गिरविले. राज्याच्या ६६८ प्रशिक्षणार्थ्यांसोबत सशस्त्र संचलन केले. यावेळी मयूर सावंत म्हणाले, प्रशिक्षण सुरुवातीला खूप कठीण वाटत होते. महाराष्टÑाच्या नाशिकमधील अकादमीत दर्जेदार असे प्रशिक्षण मिळाले. महाराष्टÑाच्या मातीत प्रशिक्षणाचे धडे गिरविताना खूप आनंद अन् अभिमान वाटत होता. येथील प्रत्येक प्रशिक्षकाने आमच्यावर खूप मेहनत घेतली. सुरुवातीला माझे वजन ९२ किलो होते, मात्र येथील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता ७२ किलोवर आले आहे. यावरून प्रशिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता लक्षात येते, असे स्वदेश देसाई म्हणाले. तसेच खाकी अंगावर आल्याचा खूप आनंद होत आहे. सुरुवातीचे सहा महिने असे वाटत होते की, प्रशिक्षण आपण पूर्ण करू शकू की नाही. मात्र यानंतर महाराष्ट्राच्या मातीत आम्ही चांगलेच रुळल्याची भावना मंदार परब यांनी व्यक्त केली.शहीद पित्याचे स्वप्न करणार पूर्ण३० आॅगस्ट २०१६ साली वांद्रे पश्चिम येथे वाहतूक पोलीस म्हणून कर्तव्य बजावत असताना विलास शिंदे नामक कर्मचाऱ्याच्या डोक्यात काही समाजकंटकांनी लोखंडी सळईने हल्ला चढविला होता. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा दिपेश शिंदे याने वडिलांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. अनुकंपा तत्त्वावर त्यांना पोलीस दलात नोकरी मिळाली. त्यानंतर दीपेश यांनी प्रशिक्षण पूर्ण क रत शपथ घेतली....अन् डोळ्यात तरळले आनंदाश्रूकुटुंबापासून सुमारे १२ ते १४ महिने दूर राहत खडतर असे प्रशिक्षण घेत स्वत:च्या शरीरयष्टीपासून देहबोलीपर्यंत आमूलाग्र बदल घडविणाºया प्रशिक्षणार्थी फौजदार महिला, पुरुषांपैकी बहुतांश प्रशिक्षणार्थ्यांच्या डोळ्यात माता, पिता, भाऊ, बहीण पत्नी, मुलांना भेटल्यानंतर आनंदाश्रू तरळल्याचे पहावयास मिळाले. बहुतांश माता-पित्यांनी आपल्या कष्टाचे झालेले चीज आपल्या फौजदार मुला-मुलींच्या डोळ्यांत निरखून बघितले त्यावेळी त्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
मंजिल उन्हीको मिलती हैं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:59 AM