नायगाव : सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामविकास संस्था व युवक फाउण्डेशनच्या वतीने राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाहेरून आलेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याची शपथ घेण्यात आली.राज्यासह संपूर्ण देशात कोरोना या विषाणूजन्य आजाराने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून वडझिरे ग्रामविकास समिती, युवक फाउण्डेशनच्या वतीने व नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या (सिव्हिल) सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात रक्तदात्यांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवण्यात आले होते.या शिबिरात गावातील ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी आयोजकांनी कोरोनाशी लढणाऱ्यांसाठी व लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या गरजूंना कोरोना हारेपर्यंत मदत करण्याची शपथ घेतली. जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी कोरोनाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी ग्रामविकास संस्थेचे भास्कर ठोंबरे, अशोक नागरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप गिते, वनाधिकारी मनोहर बोडके, पोलीस अधिकारी भीमराव दराडे, पांडुरंग बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली जयराम गिते, अंकुश गिते, संदीप नागरे, रवि दराडे, अभि बोडके, अनिल बोडके, जगदीश कापसे, गौतम ठोंबरे, अमोल ठोंबरे, प्रभू ठोंबरे, राजू आंबेकर आदींनी परिश्रम घेतले.
त्यांनी घेतली मजुरांना मदत करण्याची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 11:28 PM
सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामविकास संस्था व युवक फाउण्डेशनच्या वतीने राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाहेरून आलेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याची शपथ घेण्यात आली.
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : वडझिरे ग्रामविकास संस्था व युवक सरसावले