नाशिक : एचआयव्ही, एड्सबाधित मुलांना मदतीचा हात समाजाकडून मिळावा, यासाठी एचआयव्हीग्रस्त बालकांचे संगोपन करणाºया ‘पालवी प्रकल्प’संस्थेला चौधरी प्रतिष्ठानने साथ दिली आहे. पालवीमधील एचआयव्हीबाधित मुले ‘आम्ही प्रकाशबीजे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम नाशिककरांसाठी सादर करणार आहे.‘संरोह’ सांस्कृतिक उत्सवांतर्गत ‘हिलिंग थ्रू पाथ आॅफ लव्ह’ या संकल्पनेतून ‘ती’ विशेष बालके ‘आम्ही प्रकाशबीजे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या १८ जानेवारी रोजी आपले कलागुण मंचावर सादर करणार आहे. पालवी संस्थेमध्ये एकूण ११४ एचआयव्हीबाधित मुलांचे संगोपन केले जाते. या मुलांपैकीची काही मुले यानिमित्ताने नाशिककरांच्या भेटीस येत आहे. नवीन वर्षात गुरुवारी (दि.१८) संध्याकाळी साडेपाच वाजता विश्वास लॉन्स सावरकरनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. चौधरी प्रतिष्ठानच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून मदतनिधी उभारला जाणार असून, पासेसच्या विक्रीतून संकलित झालेला निधी पालवी संस्थेला कार्यक्रमाच्या अखेरीस देण्यात येणार असल्याची माहिती कल्याणी चौधरी यांनी दिली. शुक्रवारी (दि.१९) या विशेष मुलांची सहलदेखील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. शहरातील विविध पर्यटनस्थळांना ही बालके भेट देणार आहे.