२६ फेब्रुवारी रोजी शहरातील म्हसोबानगर परिसरातून राकेश कृष्णदास भांबारे यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (एम.एच.१५, ईपी ३१९३) चोरीस गेली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस नाईक शाहनवाज शेख, पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ शेख यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. ही कार चोरी करणारा संशयित आरोपी शेख दाऊद शेख मंजूर हा बुलडाणा शहरात कार विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने सापळा रचून चोरी गेलेल्या कारसह चोरट्यास बुलडाणा येथून ताब्यात घेतले. दरम्यान, अटक केलेल्या शेख दाऊद शेख मंजूर याचे आणखी तीन साथीदार फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
(१५ येवला स्विफ्ट)
===Photopath===
150621\15nsk_28_15062021_13.jpg
===Caption===
१५ येवल स्वीफ्ट