शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र खेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 10:26 PM

घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना पाथर्डी शिवारातील नरहरिनगर भागात घडली.

नाशिक : घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना पाथर्डी शिवारातील नरहरिनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवपॅलेस अपार्टमेंटमध्ये राहणाºया शोभा गोवर्धने या गुरुवारी दुपारी मुलांना शिकवणीसाठी सोडण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घराकडे परतत असतांना समोरून येणाºया ट्रिपलसिट दुचाकीस्वारांपैकीएकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचेमंगळसूत्र खेचून नेले.सिडको भागात तरुणाची आत्महत्या सिडकोतील उत्तमनगर भागात राहणाºया २० वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. निरज शंकर फेगडे (वय २०, रा.साईदर्शन रो-हाउस,आनंदवन कॉलनी असे आत्महत्या करणाºया युवकाचे नाव आहे. निरज याने गुरुवारी रात्री आपल्या घरात वरच्या मजल्यावरील खोलीत पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी डॉ. राहुल पाटील यांनी त्यास मृत घोषित केले.दोघा महिलांचे मोबाइल लंपास मेनरोडवर खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या दोन महिलांच्या पर्समधून चोरट्यांनी रोकडसह मोबाइल चोरून नेले. ही घटना धुमाळ पॉइंट भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीशालनी विजय वर्मा (रा. रविशंकर मार्ग, फेम सिनेमामागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. वर्मा या आपली मैत्रिण अक्षदा यांच्यासोबत गुरुवारी खरेदीसाठी मेनरोड भागात आल्या होत्या. धुमाळ पॉइंट परिसरात त्या पंजाबी ड्रेस मटेरियल खरेदी करीत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या व अक्षदा नामदेव गायकर यांच्या पर्समधून दोन मोबाइल व रोकड, असा सुमारे पंधरा हजारांचा ऐवज चोरून नेला.उघड्या खिडकीतून मोबाइलची चोरी घराच्या उघड्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी दोन मोबाइल चोरून नेल्याची घटना दिंडोरीरोड वरील पोकार कॉलनीत घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोकार कॉलनीतील पर्ल सोसायटीत राहणारे विशाल पांडूरंग मोरवाल यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मोरवाल कुटुंबीय गुरुवारी आपापल्या कामात व्यस्त असताना अज्ञात चोरट्यांनी बेडरूमच्या उघड्या खिडकीत हात घालून ड्रेसिंग टेबलवर चार्जिंगसाठी लावलेले सुमारे २३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरून नेले.जेलरोड भागात घरफोड्यांमध्ये वाढ जेलरोड भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांमध्ये वाढ झाली आहे. लोखंडे मळा पुष्पकनगर येथे बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. जेलरोड लोखंडे मळा पुष्पकनगर येथील संदीप चंद्रभान मालुंजकर यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, शुक्रवार (२ आॅगस्ट) रोजी सायंकाळी ५.३० वाजता चंद्रभान मालुंजकर हे बंगल्याला कुलूप लावून नातवाला घेण्यासाठी क्लासला गेले होते. अर्ध्या तासाच्या अवधीत अज्ञात चोरट्याने बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून पावणेचार तोळे वजनाचे ५० हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र, चारचाकी व दुचाकी गाडीचे मूळ कागदपत्र चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी