मालेगाव : शहरालगतच्या टेहरे शिवारात चोरट्यांनी गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. घरफोड्या करून किमती ऐवज लंपास केला आहे. आता चोरट्यांनी पशुधनावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. भूषण दादाजी शेवाळे यांच्या मालकीची ७० हजार रुपये किमतीचे दोन बैल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून टेहरे शिवारातील शेतमळ्यांमध्ये चोरट्यांनी घरफोड्या केल्या होत्या. या घरफोड्यांमधून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. पोलिसांचा धाक उरला नसल्याने चोरट्यांनी आता पशुधनावर लक्ष्य केले आहे. अज्ञात चोरट्यांनी भूषण शेवाळे यांच्या पत्र्याच्या शेडचे कडीकोयंडा तोडून बांधलेल्या बैलांची दोरी कापून बैल चोरून नेले आहे. या चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
टेहरे शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 1:09 AM
मालेगाव : शहरालगतच्या टेहरे शिवारात चोरट्यांनी गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. घरफोड्या करून किमती ऐवज लंपास केला आहे. आता चोरट्यांनी पशुधनावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. भूषण दादाजी शेवाळे यांच्या मालकीची ७० हजार रुपये किमतीचे दोन बैल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देछावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल