कुंडाणे येथील युवा शेतकरी मुकेश आहेर यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून एक वर्षांपूर्वी शिरसमणी शिवारात सुनील वाघ यांच्या शेताच्या कडेला बी - बियाणे, रासायनिक खते, औषधांचे बिजासनी कृषी सेवा केंद्र या नावाने पत्र्याच्या टपरीत दुकान सुरू केले आहे. नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजता दुकान उघडण्यासाठी आहेर आले असताना त्यांना दुकानातील गल्ला अर्धवट उघडलेला व दुकानातील विक्रीच्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या तसेच टपरीच्या दक्षिण व पश्चिम बाजूस असलेल्या कोपऱ्याची पत्रे नटबोल्ट काढून पत्रा उचकटवलेला आढळून आला. त्यावरून दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कळवण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
चोरट्यांनी दुकानातील वेगवेगळ्या कंपन्यांची शेतोपयोगी औषधे, रासायनिक खते व गल्ल्यातील रोकडसह दोन लाख ४१ हजार ३८८ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड तपास करीत आहेत.
फोटो- १४ शिरसमणी क्राइम
===Photopath===
140621\14nsk_27_14062021_13.jpg
===Caption===
फोटो- १४ शिरसमणी क्राइम