भुरट्या चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मोठेबाबा मंदिर गावाच्या मध्यवर्ती भागात आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दानपेटीतील रकमेवर डल्ला मारून ते पसार झाले. सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कचरू आव्हाड, पोलीसपाटील ज्ञानेश्वर साबळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर याबाबत वावी पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस हवालदार प्रवीण अंढागळे यांनी घटनास्थळी भेट देऊन मंदिर परिसराची पाहणी केली. त्याच रात्री गावातील एक दुचाकी चोरीला गेली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सोनेवाडी शिवारात ही दुचाकी आढळून आल्याने दुचाकी मालकाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
--------------------
फोटो ओळी :
सिन्नर तालुक्यातील दापूर येथील मोठेबाबा मंदिर देवस्थानची फोडलेली दानपेटी.
(२७ दानपेटी)
280721\28nsk_2_28072021_13.jpg
२७ दानपेटी