याबाबत संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील डॉ. दिलीपकुमार चंद्रकांत सोनवणे (४३) यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. सोनवणे हे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सिन्नर बसस्टॅण्डजवळील रस्त्यावर आपल्या इनोव्हा क्रिस्टा कारमध्ये (क्र. एम.एच. १६ बी.यू. ५५५) बसले होते. त्यादरम्यान मोटारसायकलवरून दोन अनोळखी चोरटे डॉ. सोनवणे यांच्याजवळ आले. त्यातील एकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने डॉ. सोनवणे यांचे लक्ष विचलित केल्यानंतर दुसऱ्या भामट्याने कारमधील ड्रायव्हरच्या सीटजवळील सीटवर नॉयलॉन बॅगेत ठेवलेले रोख तीन लाख रुपये, दूध संकलन केंद्राचे बँकांचे १२ चेक बुक, विविध दूध संकलन केंद्रांची कागदपत्रे असा मुद्देमाल चोरून नेला.
काही वेळाने डॉ. सोनवणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात पैसे चोरीला गेल्याची फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी घटनेचा पुढील तपास करीत आहेत.