नाशिकरोड : मुंबईच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचे गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरून नेणाºया एका सोनसाखळी चोरट्यास उपनगर पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने पकडले, तर पळून गेलेल्या दुसºया सराईत गुन्हेगाराचा पोलीस कसून शोध घेत आहे .मुंबई पोलीस कर्मचाºयाची पत्नी संजीवनी मिलिंद देशमुख या शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्रधाननगर येथे राहाणाºया बहिणीच्या घरी जात असताना बंगल्याजवळच दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले. घटना स्थळापासून काही अंतरावर उभे असलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांनी सदर चैन स्नॅचिंगची घटना त्वरित उपनगर पोलिसांना फोनवरून कळविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, अशोक वाजे, सुखदेव मगर, अरिफ शेख, राहुल खांडबहाले आदी पोलीस व्हॅनमधून प्रधाननगर येथे पोहचले. देशमुख यांनी एका चोरट्याने हेल्मेट घातले असून दुसºया चोरट्याच्या डोक्याचे काही केस गोल्डन रंगाचे असल्याचे सांगितले. रायते व इतर कर्मचारी चोरट्यांचा शोध घेत आर्टिलरी सेंटर रोडकडे वळाले. खोले मळा माहेश्वरी भवन समोर रस्त्याच्या कडेला दुचाकी घेऊन उभे असलेले दोघे चोरटे पोलीस गाडीचा सायरन ऐकल्याने पळू लागताच त्यांच्या दुचाकीने रस्त्यावरील बॅरिकेट््सला धडक दिल्याने ते खाली पडले. एकजण दुचाकी घेऊन पळून गेला, तर दुसरा चोरटा बबलू रामधर यादव (२२) रा. देवळालीगाव हा रस्त्याने पळत असताना पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने पकडले.वर्णनावरून संशयितांना ओळखलेहवालदार अशोक वाजे यांनी शनिवारी दुपारी श्री घंटी म्हसोबा मंदिराजवळ उभ्या असलेल्या सागर म्हस्के व त्यांच्या साथीदाराला हटकले असता ते पळून गेले. वाजे यांनी त्यांचा पाठलाग सुद्धा केला होता. म्हस्के यांच्या सोबत असलेल्या युवकाने डोक्याचे केस काही प्रमाणात गोल्डन केल्याचे वाजे यांनी बघितले होते. सायंकाळी मंगळसूत्र चोरून गेल्यानंतर देशमुख यांनी संशयिताचे केलेल्या वर्णनानुसार हवाल दार अशोक वाजे यांनी खोले मळा येथे दोघा संशयितांना ओळखून पाठलाग केल्याने एकास पकडले.
चोरट्यास पाठलाग करून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:36 AM