नांदगाव : बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन जरूर नाचा, मात्र त्यांचे विचार डोक्यात घ्यायला हवेत, असे परखड प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते तसेच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले.येथील आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्ताने युवा नेते मनोज चोपडे, गौतम जगताप यांच्या संकल्पनेतून ह्यसंविधान के सन्मान मे, बहुजन मैदान मेह्ण हा संविधान जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आनंदराज आंबेडकर बोलत होते. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसदार असलेले नातू आनंदराज पहिल्यांदा नांदगाव शहरात येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जुन्या नव्या पिढीतल्या जनतेने मोठी गर्दी केली होती. जिल्हा परिषदेच्या शिवनेरी विश्रामगृहापासून आनंदराज आंबेडकर यांना सवाद्य वाजत गाजत व्यासपीठावर आणण्यात आले. बुद्धिभेद करणाऱ्या प्रवृत्तीपासून बहुजन समाजाने सावधानता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे सांगत आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले, बाबासाहेबांनी समाजातील अन्यायग्रस्तांकरिता कार्य केले. त्यामुळे कामगार, महिला, शेतकरी यांसह विविध वर्गातील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली. आता बहुजनांनी जागृत असणे आवश्यक आहे. संविधानामुळे देश एकसंध राहिला असून, यापुढील काळात देखील संविधान वाचवायचे असल्याचे सांगितले. मनोज चोपडे यांनी प्रास्ताविक, तर आनंद पवार यांनी सूत्रसंचालन केले. रोहित जाधव, सोनू पेवाल, दीपक अंबोरे, आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.मान्यवरांचा सन्मानलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, स्वागताध्यक्ष विजय बोरसे, माजी आमदार ॲड. अनिल आहेर, वाल्मीक जगताप, ॲड. विद्या कसबे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्रीकृष्ण रत्नपारखी, ॲड. विद्या कसबे, ॲड. विजय रिंढे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध मान्यवरांना आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते संविधान उद्देशिका देऊन सन्मान करण्यात आला.
बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचताना विचारही घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 12:18 AM
नांदगाव : बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन जरूर नाचा, मात्र त्यांचे विचार डोक्यात घ्यायला हवेत, असे परखड प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते तसेच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले.
ठळक मुद्देआनंदराज आंबेडकर : नांदगाव येथील कार्यक्रमात प्रतिपादन