शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

तिसºया श्रावणी सोमवारीही शुकशुकाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 8:48 PM

त्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्यात गर्दीने गजबजून जाणाºया त्र्यंबकेश्वरमध्ये तिसºया श्रावणी सोमवारीही ज्योतिर्लिंग मंदिरासह कुशावर्त परिसरात शुकशुकाट होता. फेरी मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत त्र्यंबकराजाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्र्यंबकेश्वरला श्रावणातील तिसºया सोमवारला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी श्रावणात ब्रह्मगिरीला भाविकांचा फेरीच्या रूपाने वेढा पडलेला असे; पण यंदा कोरोनामुळे गर्र्दी होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : फेरी मार्गावर पोलीस बंदोबस्त, मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्यात गर्दीने गजबजून जाणाºया त्र्यंबकेश्वरमध्ये तिसºया श्रावणी सोमवारीही ज्योतिर्लिंग मंदिरासह कुशावर्त परिसरात शुकशुकाट होता. फेरी मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत त्र्यंबकराजाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.त्र्यंबकेश्वरला श्रावणातील तिसºया सोमवारला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी श्रावणात ब्रह्मगिरीला भाविकांचा फेरीच्या रूपाने वेढा पडलेला असे; पण यंदा कोरोनामुळे गर्र्दी होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.तिसºया सोमवारच्या पालखीला फक्त गावातीलच नागरिकांची किमान पन्नास एक लोकांची गर्दी दिसून आली. त्यात विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल, दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी, संतोष कदम, पंकज भुतडा, संतोष कदम, तृप्ती धारणे, पालिकेचे मुख्य अधिकारी तथा देवस्थानचे पदसिद्ध सचिव संजय जाधव आदींसह प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य आदींसह विश्वस्त उपस्थित होते. पालखी मंदिरातून मेनरोडने कुशावर्तावर वाजतगाजत नेण्यात आली. नेहमीप्रमाणे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. कुशावर्तावरील पूजेचे पौराहित्य चिन्मय फडके, मंगेश दिघे, गिरश जोशी यांनी केले. यावेळी देवाला स्नान करून पूजा, आरती पुष्पांजली वाहण्यात आली व पुन्हा पालखक्ष पारंपरिक मार्गाने म्हणजे लहान बाजारपट्टीतून मंदिरात आणण्यात आली. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे कोठी हॉलमध्ये सुवर्णजडीत मुकुटधारी पंचमुखी मुखवटा दाखविण्यात आला. यावेळीही मोजकेच भाविक उपस्थित होेते.त्र्यंबकराजाचे आॅनलाइन दर्शनत्र्यंबकराजाचे दर्शन आॅनलाइन सुरू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे त्र्यंबकराजाचे भाविकांना घरबसल्या दर्शन मिळणार आहे. तसेच मींदर उघडण्याची परवानगी शासनाकडून मिळाल्यानंतर प्रत्यक्ष दर्शन सेवा मिळणारच आहे. तथापि, आॅनलाइन दर्शन सेवा मात्र कायम स्वरूपी मिळणार आहे.सोमवारी पेगलवाडी फाटा, पहिणे फाटा, वाडिवºहे, घोटी, त्र्यंबकेश्वर मंदिर कुशावर्त तीर्थ आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरी फेरी बंद आहे. ब्रह्मगिरी येथे जाऊन गर्दी करू नका, मंदिर बंद असल्याने दर्शन मिळणार नाही, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांसह १ डीवायएसपी, ९ सहायक पोलीस निरीक्षक, ५९ पोलीस कमर्चारी, १० महिला पोलीस कमर्चारी तैनात आहेत. व्यावसायिकांना आर्थिक फटकाकोरोनामुळे मंदिर बंद असल्यामुळे व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बस, प्रवासी वाहतूक, धार्मिक विधी यांच्यावर निर्बंध लावले आहेत. मंदिर उघडल्याशिवाय व एसटी बस, प्रवासी टॅक्सी, वाहतूक सुरु झाल्याशिवाय त्र्यंबकेश्वरची आर्थिक घडी बसणार नाही. तोपर्यंत लोकांना आर्थिक तंगीला तोंड द्यावे लागणार आहे. त्र्यंबकेश्वरचे लॉजिंग हॉटेल्स, फरसाण दुकाने आदी आस्थापना गेल्या चार महिन्यांपासून बंदच आहेत. श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वर भेटीसाठी अगर ब्रह्मगिरी फेरीसाठी नाही आले तरी चालते, पण तिस-या श्रावण सोमवारी आले तर संपूर्ण श्रावणाचे व अन्य तीन सोमवारचे पुण्य पदरी पडते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. विशेषकरून तिसºया सोमवारी अलोट गर्दी होत असे.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर