निफाड : तालुक्यातील तामसवाडी येथे सोमवारी रात्री पुन्हा एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. हा मादी बिबट्या ४ ते ५ वर्षांचा आहे. अवघ्या ११ दिवसाच्या अंतरात तिसरा बिबट्या तामसवाडी येथे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.निफाड तालुक्यातील तामसवाडी येथे बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने येथील शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडे परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने तामसवाडी येथील किरण शिंदे यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. शनिवारी (दि.२३ फेब्रुवारी) रात्री या पिंजऱ्यात नर बिबट्या जेरबंद झाला होता. याच परिसरात अजून एका बिबट्याचे दर्शन होत असल्याचे शिंदे यांनी वनअधिकाऱ्यांना सांगितले, त्यामुळे ज्या ठिकाणी पहिला बिबट्या जेरबंद झाला त्याच ठिकाणी शिंदे यांच्या शेतात लगेचच दुसरा पिंजरा तातडीने लावण्यात आला. शुक्रवारी (दि.१ मार्च) रात्रीच्या सुमारास हा दुसरा बिबट्या जेरबंद झाला.तर किरण शिंदे यांच्या शेतापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर भास्कर शिंदे यांच्या शेतात लावलेल्या पिंजºयात सोमवारी (दि.४) रात्री बिबट्या जेरबंद झाला.सदरची घटना भास्कर शिंदे यांनी वनविभागाला कळविल्यानंतर येवला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली, विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक भय्या शेख व वनमजूर यांच्या पथकाने शिंदे यांच्या शेतात तातडीने भेट दिली. बिबट्याला निफाड वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले. पशुवैद्यकीय अधिकाºयांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली.अवघ्या ११ दिवसाच्या अंतरात फक्त १५० मीटरच्या अंतरावर असलेल्या शेतात ३ बिबटे तामसवाडी येथे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आल्याने तामसवाडी तसेच परिसरातील येथील ग्रामस्थ व शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.
तामसवाडीत तिसरा बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 12:53 AM
निफाड : तालुक्यातील तामसवाडी येथे सोमवारी रात्री पुन्हा एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. हा मादी बिबट्या ४ ते ५ वर्षांचा आहे. अवघ्या ११ दिवसाच्या अंतरात तिसरा बिबट्या तामसवाडी येथे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
ठळक मुद्देअवघ्या ११ दिवसाच्या अंतरात तिसरा बिबट्या तामसवाडी येथे जेरबंद करण्यात वनविभागाला यश