नाशिक : अकरावी प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अद्याप अर्ज करू न शक लेल्या विद्यार्थ्यांनी २७ व २८ जुलैला आॅनलाइन अर्ज दाखल केले असून, या विद्यार्थ्यांसह पहिल्या दोन फेºयांमध्ये प्रवेशाची संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी (दि. ३१) जाहीर केली जाणार आहे. अकरावी प्रवेशप्र्रक्रियेच्या दोन फेºयांनंतर मंगळवारपासून तिसरी फेरी सुरू होणार असून, या फेरीत गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर २ आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. या फेरीतील रिक्त जागांच्या तपशीलासह तिसºया गुणवत्ता यादीतील कटआॅफ ३ आॅगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ३ व ४ आॅगस्टला आॅनलाइन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश अर्जाचा भाग १ व २ भरण्याची संधी मिळणार असून, ७ आॅगस्टला चौथी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर त्यानुसार चौथ्या फेरीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशप्र्रक्रियेच्या दोन फेºयांनंतर मंगळवारपासून तिसरी फेरी सुरू होणार असून, या फेरीत गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर २ आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे अकरावीत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार असून, यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
अकरावी प्रवेशासाठी उद्या तिसरी गुणवत्ता यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:40 PM