नाशिक महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असून, यात प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून, अर्जाचा भाग १ व भाग २ भरण्याकरिता शनिवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर रविवार (दि. १३) आणि सोमवार (दि. १४) असे दोन दिवस तांत्रिक प्रक्रिया राबविण्यासाठी शिक्षण विभागाने राखीव ठेवले होते. आताही प्रक्रिया पूर्ण झाली असून, मंगळवारी सकाळी ११ वाजता तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी १८ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
इन्फो-
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत सुमारे आठ हजार १४०, तर दुसऱ्या फेरीत दोन हजार ६५० विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. दोन्ही फेऱ्यांमध्ये एकूण १० हजार ७९० प्रवेश निश्चित झाले आहे. तर तिसऱ्या फेरीसाठी १४ हजार ४८० जागा उपलब्ध आहेत.