नाशिक : महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या १४ हजार १५३ जागांसाठी तिसऱ्या फेरीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि. ९) रात्री ८ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे व ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर १० ते १२ सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांकडून प्राप्त माहितीवर प्रक्रिया केली जाणार असून सोमवारी (दि. १३) तिसऱ्या फेरीसाठी गुणवत्ता यादीसोबतच प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना जागावाटपाची यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना १३ ते १६ सप्टेंबर या कालावधी संधी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
आतापर्यंतची प्रवेश प्रक्रिया
कनिष्ठ महाविद्यालये - ६०
उपलब्ध जागा - २५,३८०
एकूण अर्ज - २४,१८६
अर्जांची पडताळणी - २१,७३३
पर्याय निवडले - १९,९९०
प्रवेश निश्चित -११,२२७
रिक्त जागा - १४,१५३