सायखेडा : महाजनपुर शिवारात पंधरा दिवसात एकाच शेतात एकाच ठिकाणी तिसरा बिबट्या पिंज-यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेच निश्वास सोडला असला तरी आणखी बिबट्या असल्याची भीती कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनक्षेत्र कमी झाल्याने भक्षाच्या शोधात बिबट्यानी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. गोदाकाठ भागात गोदावरीचे खोरे असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे लपण्यासाठी बिबट्या सातत्याने येतो. मात्र महाजनपुर, तळवाडे, भेंडाळी, औरंगपूर व बागलवाडी शिवारात सातत्याने दुष्काळ परिस्थितीमुळे ऊसाचे क्षेत्र नाही. शिवाय टेकडी, डोंगर,दाट झाडी असा कोणताही क्षेत्र बिबट्याला लपण्यासाठी नसल्याने बिबट्या या भागात आल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. नाशिक महानगर पालिका, सिन्नर नगर परिषद आपल्या शहरी भागातील मोकाट कुत्रे पकडून या भागात सोडतात कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर ,शेतात फिरताना दिसतात. बिबट्याला इतर ठिकाणी भक्ष मिळत नसल्याने कुत्र्यांच्या मागोव्याने या भागात सातत्याने येत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. खरीप हंगामातील पिकांचे कामे शेतात सुरू असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतकºयांना शेतात जावे लागते. वन विभागाच्या अधिकाºयांनी बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, पकडलेले बिबटे परत पुन्हा या भागात सोडले जात असल्याचा दावा केला जात आहे. या भागात बिबटे सोडू नये अन्यथा गावातील नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा सरपंच आशा बचवंत फड, भगवान ताडगे, योगेश फड,राहुल फड,संपत फड, किरण फड,संदीप फड, साहेबराव फड यांनी दिला आहे.----------------------------मजबूत पिंजरा लावण्याची मागणीवनविभागामार्फत लावण्यात आलेल्या पिंजºयाची कडी अचानक निघाल्याने बिबट्या बाहेर पडण्याच्या स्थितीत आलेला होता. बिबट्याला पहाण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. अशा परिस्थितीत बिबट्या बाहेर आला असता तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने बिबट्याच्य दणक्याने कडी लागली गेल्याने अनर्थ टळला, यापुढे मात्र वनविभागाने मजबूत पिंजरा लावावा.-भगवान ताडगे, नागरिक, महाजनपुर
पंधरा दिवसात एकाच ठिकाणी तिसऱ्यांदा बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:27 PM