नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्र्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला असून, सुधारित अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या छपाई आणि वितरणाचे काम सुरू असतानाच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि बारावीचा अभ्यासक्रमही नव्याने प्रकाशित करण्याचा विचार सुरू आहे.तिसरी व बारावीच्या अभ्यासक्रमांचे २०१९-२० हे अखेरचे शैक्षणिक वर्ष असल्याचे पत्र पाठ्यपुस्तक महामंडळांकडून काढण्यात आले असून, याविषयीची माहिती नाशिक महानगर पालिकेचे प्रशानाधिकारी तथा शिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यातून दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून दुसरी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमामध्ये तोंडी, प्रकल्प परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी देण्यात येणारे गुण बंद होणार आहेत. प्रात्यक्षिके असलेले विषय वगळता सर्व विषयांची शंभर गुणांची परीक्षा होणार आहे. एनसीईआरटीच्या नव्या निर्देशानुसार राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी अभ्यासक्रम बदलण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार गतवर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. तर २०१९-२० शैक्षणिक वर्षात दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर पुढील वर्षी तिसरी आणि बारावीचा अभ्यासक्रम बदलणे प्रस्तावित असल्याचे उदय देवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यातून स्पष्ट केले आहे.
पुढील वर्षी बदलणार तिसरी, बारावीचा अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 3:48 PM
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्र्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला असून, सुधारित अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या छपाई आणि वितरणाचे काम सुरू असतानाच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि बारावीचा अभ्यासक्रमही नव्याने प्रकाशित करण्याचा विचार सुरू आहे.
ठळक मुद्देतिसरी आणि बारावीचा अभ्यासक्रमही बदलणार मनपा शिक्षणाधिकाऱ्यांचे प्रसिद्धीपत्रक