नाशिक : अभय प्रशाल (इंदूर) येथे दि. १२ ते १७ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या राष्टÑीय वेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या एकूण अकरा खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नाशिकच्या खेळाडूंची एवढ्या मोठ्या संख्येने निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची आंतरराष्टÑीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होणार आहे.४० वर्षांवरील पुरु षांच्या महाराष्ट्र अ संघाच्या संघनायकपदी पंकज रहाणे यांची निवड झाली, तर ब संघाच्या संघनायकपदी दिवेंदू चांदूरकर यांची निवड झाली आहे. ६० वर्षांवरील महाराष्टÑाच्या संघात उमेश कुंभोजकर यांची, तर ६५ वर्षांवरील संघाच्या नायकपदी शिवानंद कुंडाजे यांची निवड झाली आहे. रवींद्र लिमये यांचादेखील या संघात समावेश आहे.४० वर्षांवरील महिलांच्या संघाच्या नायकपदी सुनीता धटींगण यांची निवड झाली. उज्ज्वला कांबळे यांचाही या संघात समावेश आहे. ५० वर्षांवरील महिला संघासाठी विनता माने यांची संघनायक म्हणून निवड झाली. ६० वर्षांवरील संघात ज्योती कुलकर्णी, गीता कुमठेकर व रोहिणी सहस्रबुद्धे यांची निवड झाली.६५ वर्षांवरील संघात अंजली कानेटकर यांची निवड झाली. हे सर्व खेळाडू नाशिक जिमखाना येथे सराव करतात.---------------------------------------------------पंकज रहाणे व सतीश शिरसाठ राज्य अजिंक्यपद विजेतेनाशिक : सांगली येथे नुकत्याच झालेल्या राज्य वेटरन्स अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या पंकज रहाणे यांनी४० वर्षांवरील वयोगटात राज्य अजिंक्यपद मिळवून अलौकिक कामिगरी केली.७० वर्षांवरील वयोगटात सतीश शिरसाठ यांनी अजिंक्यपद मिळवले. पंकज रहाणे यांनी अंतिम फेरीत सोलापूरच्या मनीष रावत यांचा पराभव करून राज्य अजिंक्यपद मिळवले.खेळाडूंच्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, राधेश्याम मुंदडा, नितीन चौधरी, अभिषेक छाजेड, मिलिंद कचोळे, संजय वसंत, सतीश पटेल आदींनी अभिनंदन केले आहे.
टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकचे तेरा खेळाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 4:14 PM
नाशिक : अभय प्रशाल (इंदूर) येथे दि. १२ ते १७ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या राष्टÑीय वेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या एकूण अकरा खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नाशिकच्या खेळाडूंची एवढ्या मोठ्या संख्येने निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची आंतरराष्टÑीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होणार आहे.
ठळक मुद्दे७० वर्षांवरील संघाच्या नायकपदी सतीश शिरसाठ यांची निवड झाली.