शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

तेरा रस्त्यांना जिल्हा मार्ग म्हणून मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:10 AM

बागलाण तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग म्हणून नोंद असलेल्या ३४६४ किलोमीटरच्या तेरा रस्त्यांच्या सुधारित प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. या रस्त्यांमध्ये नव्याने २३२ किलोमीटरची भर पडून ३६९६ किलोमीटरचे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.

ठळक मुद्देबागलाण तालुका । रस्त्यांचा दर्जा सुधारण्याला मिळणार संधी

सटाणा : बागलाण तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग म्हणून नोंद असलेल्या ३४६४ किलोमीटरच्या तेरा रस्त्यांच्या सुधारित प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली.या रस्त्यांमध्ये नव्याने २३२ किलोमीटरची भर पडून ३६९६ किलोमीटरचे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. नाशिक जिल्हा परिषदेने पाठवलेल्या प्रस्तावानंतर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव प्रशांत पाटील यांनी तसे परिपत्रक काढले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार बोरसे यांनी ही मागणी केली होती.बागलाण तालुक्यासह इतर जिल्ह्यांना जोडणारे हे रस्ते जिल्हा परिषदकडे होते. पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे या कामांची अतिशय दुरवस्था होऊन दळणवळणची समस्या निर्माण झाली होती. आता या रस्त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत केल्यामुळे या रस्त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. एकूण तेरा रस्ते इतर जिल्हा मार्ग मधून प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून नव्याने नावरूपास येणार आहेत. यामध्ये दोनशे बत्तीस किलोमीटरच्या अधिकच्या रस्त्यांची भर पडणार आहे. आगामी काळात या रस्त्यांच्या विकासासाठी पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची भरीव तरतूद करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार बोरसे यांनी सांगितले.प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत झालेले रस्तेउत्राणे-तळवाडे भामेर-बिलपुरी, बोढरी-चिराई ,सटाणा-चौगाव, कºहे-रातीर- जुने रातीर, वायगाव, चौंधाणेपासून-नवे निरपूर-खमताणे-सटाणा, खामखेडा-सावकी-ठेंगोडा-आराई-शेमळी, ढोलबारे-पारनेर-निताणे, लाडूद-सोमपूर-तांदूळवाडी, नांदिन- जुने रातीर, कुपखेडा-खिरमाणी-फोपीर-आसखेडा-वाघळे—श्रीपूरवडे-टिंगरी, निताणे-जायखेडा-एकलहरे-वाडी पिसोळ, दºहाणे-पिंपळदर-नवेगाव-तिळवण, सरवर-दहिंदुले, जोरण, इजमाणे-मळगाव-भामरे, पोहाणे, अजमीर सौंदाणे, चौगाव-भाक्षी-भंडारपाडा, आव्हाटी, देवळाणे- नवे रातीर, सारदे-अंबासन, सोमपूर-भडाणे-पिंपळकोठे, दसवेल-तुंगन दिगऱ

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा