पिळकोस : कळवण तालुक्यातील मानूर येथील शेतकरी तुकाराम दत्तू पवार यांनी विकत घेऊन खळ्यात साठवलेला तेरा ट्रॉली मका चारा बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने पेटवून दिल्याने तुकाराम पवार यांचे मोठे नुकसान झाले. याबाबतीत मानूर सजाचे तलाठी यांनी पंचनामा केला आहे. अवघ्या अर्ध्या तासात संपूर्ण चारा जळून खाक झाल्याने शेतकºयावर चारा शोधण्याची वेळ आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकत घेलेला चारा जळून खाक झाल्यामुळे गावकºयांकडून हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी रात्री सुनील बोरसे हे रात्री मालेगावहून घराकडे परतले असताना त्यांना पवार यांच्या चाºयाच्या खळ्याला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ पवार कुटुंबीयांना फोन केला. खळ्याला आग लागल्याचे समजताच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर धावून आले; मात्र संपूर्ण खळ्यातील चाºयाने चारही बाजूने पेट घेतलेला होता व आगीचे झोत मोठे असल्याने चारा पूर्णपणे जळून खाक झाला. यात अमोल पवार या शेतकºयाची म्हैस होरपळली असून, सुनील बोरसे व गावकºयांच्या मदतीमुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.लाखो रुपयांचे नुकसानमानूर येथील शेतकरी तुकाराम पवार हे अल्पभूधारक असून, ते त्याच्या शेतात दोन्हीही हंगामात भाजीपाल्याची पिके घेतात तसे त्याच्या वडिलोपार्जित दुग्धव्यवसाय असल्याने त्याच्याकडे दुधाळ जनावरे मोठ्या संख्येने आहेत व त्यांना वर्षभर चारा पुरावा यासाठी त्यांनी परिसरातील शेतकºयांकडून मक्याचा वाळलेला चारा मोठ्या प्रमाणात विकत घेऊन ठेवला होता. त्यातील अर्धा चारा हा कुट्टी केलेला होता तर बाकीचा चारा तसाच पडून होता. बुधवारी रात्री अज्ञात माथेफिरूने खळ्यातील संपूर्ण चाºयाला एकसाथ आग लावल्याने पवार यांचा संपूर्ण चारा जळून खाक झाल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे तसेच त्यांना त्यांच्याकडील जनावरांसाठी पुन्हा चारा उपलब्ध करण्याची वेळ आली आहे.
तेरा ट्रॉली मका चारा जळून खाक मानूर : अज्ञात इसमाने आग लावल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:49 PM
पिळकोस : शेतकरी तुकाराम दत्तू पवार यांनी खळ्यात साठवलेला तेरा ट्रॉली मका चारा अज्ञात माथेफिरूने पेटवून दिल्याने पवार यांचे नुकसान झाले.
ठळक मुद्दे तलाठी यांनी पंचनामा केलाचाºयाच्या खळ्याला आग