शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

थर्टी फर्स्ट : अभयारण्यांसह गड-किल्ल्यांवर मुक्काम कराल तर शिक्षा भोगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 4:49 PM

नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अहमदनगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, नांदूरमध्यमेश्वर, यावल व अनेर डॅमचा परिसरात सोमवारपासून सुर्यास्तानंतर कोणीही मुक्कामी थांबू शकत नाही

ठळक मुद्देअभयारण्यक्षेत्रात वन्यजीवांचा धोका अभयारण्यक्षेत्रात रात्रीचा मुक्काम टाळावाधुम्रपान, मद्यप्राशन, बारबेक्यू पेटविण्यावर कायद्याने निर्बंध

नाशिक : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर हैशी पर्यटकांचा हैदोस रोखण्यासाठी नाशिक वन-वन्यजीव विभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनक्षेत्रपालांच्या नियंत्रणाखाली वनपाल, वनरक्षकांचे विशेष गस्ती पथके कार्यान्वित केली आहे. तसेच सुर्यास्तानंतर अभयारण्यक्षेत्र व गड-किल्ल्यांवर मुक्काम करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे प्रभारी मुख्य वनसंरक्षक तथा वन्यजीव वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी जाहीर केले आहे.नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अहमदनगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, नांदूरमध्यमेश्वर, यावल व अनेर डॅमचा परिसरात सोमवारपासून सुर्यास्तानंतर कोणीही मुक्कामी थांबू शकत नाही, असे वन्यजीव विभागाने प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. तसेच विभागातील विविध गड-किल्ले तसेच पायथ्यांभोवती असलेल्या राखीव वनांमध्येही मुक्काम करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.३१डिसेंबरची रात्र साजरा करण्यासाठी हौशी पर्यटकांनी अभयारण्यक्षेत्र, गड-किल्ले, धरणकिनारे अशी ठिकाणे निवडू नये, जेणेक रून कुठल्याहीप्रकारची अनुचित घटना घडणार नाही. रात्रीच्यावेळी अभयारण्यक्षेत्रात वन्यजीवांचा धोका अधिक वाढलेला असतो. तसेच गड-किल्ल्यांच्या परिसरातदेखील अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे सुजाण पर्यटकांनी वन्यजीव व वनविभागाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पर्यटकांसह दुर्गप्रेमींनी अभयारण्य व गड-किल्लयांच्या परिसरातून सुर्यास्ताअगोदरच निघून जावे. संध्याकाळनंतर अभयारण्यक्षेत्र व गड-किल्ल्यांवर थांबू नये, अन्यथा नाशिक मुख्य वनसंरक्षक तथा वन्यजीव संरक्षकांच्या आदेशानुसार वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७नुसार कारवाई करण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे. नाशिक वन्यजीव विभागांतर्गत कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचा समावेश होतो. या अभयारण्यक्षेत्रात भंडारदरा धरणाभोवतालची सांदण दरी, घाटघर, पांजरे, उडदावणे, मुतखेल, रतनवाडी आदि गावे येतात. या सर्व गावांच्या परिसरात थर्टीफर्स्टच्या निमित्ताने पर्यटकांचा लोंढा वाढलेला असतो. मात्र पर्यटकांनी अभयारण्यक्षेत्रात रात्रीचा मुक्काम टाळावा तसेच रात्री या भागात वाहनांची गर्दी करू नये. कुुठल्याहीप्रकारे धुम्रपान, मद्यप्राशन, बारबेक्यू अभयारण्यक्षेत्रात पेटविण्यावर कायद्याने निर्बंध घालण्यात आलेले आहे. त्यामुळे पर्यटकांनी हुल्लडबाजी टाळावी, जेणेकरून वन्यजीवांना धोका पोहचणार नाही. तसेच वनसंपदाही सुरक्षित राहण्यास मदत होईल. येथील हैदोसवर राजूर पोलीस ठाणे, वन-वन्यजीव विभागासह, ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीच्या सदस्यांमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरNew Yearनववर्ष