नाशिक : सटाणा महाविद्यालयाच्या १९९० च्या १२ वी विज्ञान शाखेच्या माजी विद्यार्थ्यांना स्नेहमेळावा नुकताच नाशिक येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात कळवण, सटाणा ,मालेगाव, बागलान सह नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई येथून आलेले सर्व वर्गिमत्र यात सहभागी झाले होते. तब्बल ३० वर्षानंतर काहींची एकमेकासोबत भेट झाल्याने वातावरण देखील भावुक झाले होते. वर्ग मित्र तथा देवळा तालुक्यातील भाजपचे पंचायत समितीचे सदस्य आणि गतवर्षी निधन झालेले पंकज निकम आणि मित्र परिवारातील ज्यांच्या आप्तेष्टांचे निधन झाले आहे अशांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी भविष्यात ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या क्षेत्रात इतरांना सर्वार्थाने मदत करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी डॉ. विवेक बागड, दत्ता साठे, रणधीर देवरे, सुलभा अहिरे, नीलिमा पगार, वंदना पगार, डॉ. कविता बच्छाव, प्रतिभा बाविस्कर, नवीद मिर्झा, गीत जाधव, सुगंध कुलकर्णी, प्रमोद गायकवाड, डॉ प्रशांत सोनवणे,अमोद पाटिल, संगीता कदम, दर्शना कापडणीस, डॉ. राजेश पाटील, प्रशांत कोठावदे आदी उपस्थित होते. राजेंद्र बच्छाव यांनी सूत्रसंचलन केले.
तीस वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 2:41 PM
सटाणा महाविद्यालयाच्या १९९० च्या १२ वी विज्ञान शाखेच्या माजी विद्यार्थ्यांना स्नेहमेळावा नुकताच नाशिक येथे उत्साहात पार पडला.
ठळक मुद्दे१९९० च्या १२ वी विज्ञान शाखेच्या माजी विद्यार्थ्यांना स्नेहमेळावा३० वर्षानंतर काहींची एकमेकासोबत भेट झाल्याने वातावरण देखील भावुक