शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

थर्टीफर्स्टला नोटाबंदीचा फटका

By admin | Published: December 29, 2016 11:52 PM

कार्यक्रम घटले : मद्यपरवान्याचाही परिणाम

नाशिक : एरव्ही मावळत्या वर्षाला निरोप व उगवत्याचे धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी आठ ते दहा दिवसांपासून नियोजनात गर्क असलेल्या सामान्य नागरिकांनी यंदा नोटबंदीमुळे उत्साहाला मुरड घालण्याचे ठरविले असून, त्याचाच भाग म्हणून की काय ‘थर्टीफर्स्ट’साठी तयारीत असलेल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉन्सचालकांनीही हात आखडता घेत मनोरंजनाचे कार्यक्रमच रद्द करण्यावर भर दिला आहे. दरवर्षी थर्टीफर्स्ट साजरा करणाऱ्यांच्या तयारीचा अंदाज घेऊन हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉन्समध्ये ३१ डिसेंबरच्या उत्तररात्रीपर्यंत मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यात आॅर्केस्ट्रा, नृत्याचे प्रकार, करमणुकीचे प्रयोग यांसह जेवणावर व मद्यपानावरही सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो, साधारणत: पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंतचे तिकीट आकारून ठेवलेल्या या कार्यक्रमांना ग्राहकांचाही प्रतिसाद मिळत असल्याने असे कार्यक्रम आयोजित करण्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांत चढाओढ लागते. गेल्या वर्षी काही मोठ्या हॉटेल्सने अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले त्याची संख्या बाराच्या आसपास होती व आठ हॉटेल्सचालकांनी थर्टीफर्स्टला काहीच कार्यक्रम ठेवले नसल्याचे प्रतिज्ञापत्र करमणूक विभागाला करून दिले होते. यंदा मात्र नोटबंदीचा फटका थर्टीफर्स्टच्या उत्साहाला बसला आहे. ग्राहकांमध्ये उत्साहच दिसत नसल्याने थर्टीफर्स्ट ‘कॅश’ करण्यासाठी सरसावणारे हॉटेल्सचालकांनी माघार घेतली आहे. करमणूक विभागाकडे फक्त तीन हॉटेल्सचालकांनी करमणुकीचे कार्यक्रम सादर करण्यासाठी अनुमती अर्ज दाखल केले आहेत, तर वीसहून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉन्स चालकांनी कोणतेही कार्यक्रम सादर केले जाणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र भरून दिले आहे. तिकीट विक्रीतून करमणुकीचे कार्यक्रम सादर केल्यास शासनाला २० टक्के कर शुल्कापोटी महसूल मिळतो. (प्रतिनिधी)एक दिवसाचा परवाना नाही३१ डिसेंबर रोजी मद्यपानासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून एक दिवसाचा परवाना दिला जातो, यंदा मात्र शासनाने अशा प्रकारचा परवाना न देण्याचे ठरविले आहे, त्यातच महामार्ग व राज्यमार्गावरील परमीट रूम व बिअर बार यांच्यावरही शासन निर्बंध लावत असल्यामुळे हॉटेल्सचालकांनी ३१ डिसेंबर रोजी नियमित व्यवसाय करण्याचे ठरविल्याने कार्यक्रम घटल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.