नाशिक- ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे सांगण्यात येत होते मात्र प्रत्यक्षात मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय करण्यात आला आहे, ही तर आरक्षणाची बॅक डोअर एन्ट्री असल्याचे सांगत ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याने एकीकडे आनंद उत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे छगन भुजबळ यांनी मात्र हे आरक्षण खरोखरच मिळाले आहे की फसवे आहे याचा विचार मराठा समाजाने करावा आवाहन केलं.शासनाने प्रसिद्ध केलेला अध्यादेश म्हणजे निर्णय नसून केवळ मसुदा आहे. त्यावर 16 फेब्रुवारी पर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. त्यामुळे ओबीसी आणि अन्य समाजातील नागरिकांनी लाखोंच्या संख्येने हरकती नोंदवाव्यात, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.
अशा प्रकारचे आरक्षण केवळ सामाजिक दबावापोटी दिले गेल्यास दलित आणि ओबीसींचे आरक्षण ही धोक्यातील असे भुजबळ म्हणाले, उद्या मुंबईतील आपल्या शासकीय निवासस्थानी या संदर्भात ओबीसी दलित आणि आदिवासी नेत्यांची बैठक घेण्यात येणार असून आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहनही भुजबळ यांनी केलं.