चौकट-
तूरडाळ महागली
किराणा बाजारात तूरडाळ, मुूगडाळ, उडीदडाळ या डाळींच्या भावात थोडीफर वाढ दिसून येत असून, इतर किराणामालाचे भाव स्थिर आहेत. मध्यंतरीच्या काळात किराणा बाजारात दिसत असलेले मंदीचे सावट कमी झाले असून, ग्राहकी वाढली आहे.
चौकट -
कांदापात ३५ रु. जुडी
भाजीबाजारात कांदापातीचा भाव अद्याप टिकून असून घाऊक बाजारात कांदापातीला २० रुपयापासून ३५ रुपये जुडीपर्यंतचा दर मिळत आहे. वांग्यांनीही ६० रुपयांपर्यंतच टप्पा गाठला असून दोडका, गिलके, भोपळा या भाज्यांनाही चांगली मागणी असून त्यांना चांगला भाव मिळत आहे.
चौकट -
मध्यंतरी झालेल्या बेमोसमी पावसाचा डाळिंबाला मोठा फटका बसला असून, नाशिक बाजारात डाळिंबाची आवक बंद झाली आहे. सफरचंद, संत्रा, चिकू, केळी या फळांची आवकही स्थिर असून त्यांचे भाव वाढले आहेत. नवीन द्राक्षांची आवकही सुरू झाली आहे.
कोट -
दर दोन-तीन दिवसाआड भाजीपाला आणि किराणा मालाचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांना मोठीच आर्थिक कसरत करावी लागत आहे. महिन्याचे बजेट सांभाळताना सर्वच गोष्टींचा विचार करावा लागतो.
- रजनी जाधव, गृहिणी
कोट -
दरराेज बदलणाऱ्या हवामानामुळे भाजीपाला पीक जगविताना त्यावर वेगवेगळी औषधे, कीटकनाशक यांची फवारणी करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत असते. बाजारात मालाला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांना दोन पैसे मिळणार आहेत.
- सुनील पोटे, शेतकरी
कोट -
मध्यंतरीच्या काळात किराणा बाजारात थोडीफार मरगळ आली होती. यामुळे ग्राहकीवर परिणाम झाला होता. आता पुन्हा ग्राहकी वाढली आहे. या सप्ताहात डाळींच्या दरात एक-दोन रुपयांनी वाढ झाली असून, खाद्यतेलाचे दर स्थिरावू लागले आहेत.
- अनिल बुब, किराणा व्यापारी