शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

‘त्या’ चायनीज विक्रेत्यांचे शिवाजी उद्यानात पुनर्वसन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:41 AM

महापालिकेने नेहरू उद्यानात अतिक्रमण केलेल्या चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्यांना महापालिकेने हटविल्यानंतर आता सदर विक्रेत्यांचे शिवाजी उद्यानात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात आहे. मात्र, शिवाजी उद्यानात सदर विक्रेत्यांना जागा दिल्यास महापालिकेकडून अतिक्रमणधारकांना एकप्रकारे प्रोत्साहनच दिले जाणार असल्याने त्यास विरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नेहरू उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे.

नाशिक : महापालिकेने नेहरू उद्यानात अतिक्रमण केलेल्या चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्यांना महापालिकेने हटविल्यानंतर आता सदर विक्रेत्यांचे शिवाजी उद्यानात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात आहे. मात्र, शिवाजी उद्यानात सदर विक्रेत्यांना जागा दिल्यास महापालिकेकडून अतिक्रमणधारकांना एकप्रकारे प्रोत्साहनच दिले जाणार असल्याने त्यास विरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नेहरू उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे.  महापालिकेने नेहरू उद्यानात गेल्या काही वर्षांपासून बिनदिक्कतपणे अतिक्रमण केलेल्या चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाºया व्यावसायिकांना हटविण्याची कारवाई काही दिवसांपूर्वीच केली. याशिवाय, या विक्रेत्यांना प्रोत्साहन देणाºया श्रमिक सेनेचा फलकही तेथून उखडून टाकला. दरम्यान, महापालिकेच्या कारवाईनंतर संबंधित विक्रेत्यांनी महापालिका प्रशासन उपआयुक्तांची भेट घेत जवळच्याच जागेत पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. मात्र, महापालिकेने जवळपास कोठेही जागा देण्यास नकार दिला. हॉकर्स झोन अंतर्गत हॉटेल संदीपजवळील जागेचा तसेच गोदाघाटावरील घासबाजाराच्या जागेचा पर्याय महापालिकेने सदर विक्रेत्यांपुढे ठेवला होता. परंतु, विक्रेत्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. याउलट, शिवाजी उद्यानात कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, याकरिता दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी उद्यानात जागा देण्यास प्रशासनाने स्पष्ट शब्दांत नकार दिल्याचे समजते. शिवाजी उद्यानात संबंधित विक्रेत्यांना जागा दिल्यास त्याचे वेगळे परिणाम दिसून येण्याची भीती व्यक्त केली जात असून, त्याला विरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेने नेहरू उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले असून, सहा महिन्यात नेहरू उद्यानाचे नवे रूप पहायला मिळण्याची शक्यता आहे.शाळेजवळील विक्रेत्यांनीही गुंडाळला गाशामहापालिकेने नेहरू उद्यानातील अतिक्रमण हटविल्यानंतर संबंधित विक्रेत्यांनी सारडा कन्या शाळेलगतच्या भिंतीजवळ व्यवसाय करू देण्याची मागणी केली होती परंतु, सदर परिसर हा नो हॉकर्स झोन असल्याने मनपाने ही मागणी फेटाळून लावलेली आहे. सारडा कन्या शाळा व्यवस्थापनानेही महापालिका आयुक्तांची भेट घेऊन भिंतीलगत असलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती, परंतु नेहरू उद्यानातील अतिक्रमणाचा धसका घेत शाळेजवळील विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला आहे.