नाशिक : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर एक हजार रुपये दंडाची कारवाई सुरू करण्यात आली होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात दंड भरण्यास नागरिक असमर्थता व्यक्त करीत असल्याने अखेरीस आयुक्तांनी दंडाच्या रकमेत घट केली असून पुन्हा दोनशे रुपये दंड आकारणीचे सुधारित आदेश रविवारी (दि १४) दिले आहे. २२ जानेवारी रोजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली आणि आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्या विशेषता मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर वचक बसवण्यासाठी दोनशेऐवजी एक हजार रुपये दंड करावा, असा निर्णय घेण्यात आल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी साथ प्रतिबंधक कायद्याच्या आधारे मास्क न वापरणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर एक हजार रुपये रुपयांची दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश दिले होते. परंतु, स्थायी समितीच्या बैठकीत हा दंड नागरिकांना अडचणीत टाकणारा आहे, अशी चर्चा झाली. त्यावेळी आयुक्तांनी दंडाची रक्कम कमी करण्यास नकार दिला होता. मात्र आता आयुक्तांनी सुधारित आदेश जारी केले असून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना पूर्वीप्रमाणेच दोनशे रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.
मास्क न वापरणाऱ्यांना आता पुन्हा दोनशे रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 1:17 AM
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर एक हजार रुपये दंडाची कारवाई सुरू करण्यात आली होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात दंड भरण्यास नागरिक असमर्थता व्यक्त करीत असल्याने अखेरीस आयुक्तांनी दंडाच्या रकमेत घट केली असून पुन्हा दोनशे रुपये दंड आकारणीचे सुधारित आदेश रविवारी (दि १४) दिले आहे.
ठळक मुद्दे आयुक्तांचे आदेश : दंडाच्या रकमेत केली घट