शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सलग दुसऱ्या दिवशी हजारावर बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 10:45 PM

नाशिक : कोरोनाचा प्रकोप सलग दुसऱ्या दिवशीही कायम असताना जिल्ह्यात गुरुवारी (दि. ११) तब्बल १,१४० नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणादेखील हादरून गेली आहे. दरम्यान, नाशिक शहरात १ तर ग्रामीणमधून २ असे एकूण ३ बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या २,१५८ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देकोरोनाची वाढ : दिवसभरात तब्बल ११४० रुग्णसंख्येची भर

नाशिक : कोरोनाचा प्रकोप सलग दुसऱ्या दिवशीही कायम असताना जिल्ह्यात गुरुवारी (दि. ११) तब्बल १,१४० नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणादेखील हादरून गेली आहे. दरम्यान, नाशिक शहरात १ तर ग्रामीणमधून २ असे एकूण ३ बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या २,१५८ वर पोहोचली आहे.बुधवारी बाधितांचा आकडा तेराशे पल्याड जाऊन १,३३० पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी १,१४० इतक्या मोठ्या प्रमाणात बाधितांची नोंद झाल्याने नागरिकांमध्येदेखील चिंतेचे सावट पसरले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सलग दोन दिवस यापूर्वी केवळ ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातच बाधित आढळले होते. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख २९ हजार ५७७ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख २१ हजार ७११ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या ५,७०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९३.९३ वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९३.७१, नाशिक ग्रामीण ९५.२१, मालेगाव शहरात ८९.१८, तर जिल्हाबाह्य ९२.३६ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ५ लाख ६९ हजार ७०१ असून, त्यातील ४ लाख ३७ हजार ३६० रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख २९ हजार ५७७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत, तर २,८२४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.बरे होण्याच्या टक्केवारीत मोठी घटमहानगरातील उपचारार्थी रुग्णांची संख्या ५,७०८ पर्यंत पोहोचली आहे. उपचारार्थी संख्येने ५ हजारांचा टप्पा गाठण्यास गतवर्षी सप्टेंबर महिना उजाडला होता. त्यानंतर बरोबर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येने ६ हजारांच्या टप्प्याकडे आगेकूच केली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याची सरासरी ९८ टक्क्यांवरून ९४ टक्क्यांपेक्षा खाली आली आहे. अवघ्या महिनाभरात रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत तब्बल ४ टक्के घसरण झाली आहे.विलंबित अहवाल तीन हजारांजवळकोरोना संशयितांचे अद्यापही तीन हजारांच्या आसपास प्रलंबित अहवाल बाकी आहेत. बुधवारपर्यंत पाच हजारांहून अधिक चाचण्यांचे अहवाल औरंगाबादच्या प्रयोगशाळेत प्रलंबित होते. ते अहवाल मिळण्यास प्रारंभ झाल्याने बाधितांच्या संख्येत आठवडाभराच्या तुलनेत मोठी वाढ झाली असून, अद्यापही प्रलंबित अहवालांची संख्या ३ हजारांजवळ आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल