निफाड : तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या आठ दरवाजांमधून ८३ हजार ७७३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.जिल्ह्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस झाल्याने दारणा, गंगापूर, कडवा, पालखेड या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. गोदावरीला पूर आल्याने हे वाढलेले पुराचे पाणी नांदूरमधमेश्वर बंधाºयात आल्यानंतर शनिवारी (दि. ३) सकाळपासून दुपारी १ वाजेपर्यंत बंधाºयाच्याआठ दरवाजांतून ४३ हजार ७३९क्यूसक पाण्याचा विसर्ग करण्यातआला.या बंधाºयात येणारे पुराचे पाणी वाढत असल्याने दुपारी १ वाजेनंतर हा विसर्ग ८३ हजार ७७३ क्यूसेस करण्यात आला. १० दिवसांपासून नांदूरमधमेश्वर बंधाºयातून विसर्ग करण्यात येत आहे. विसर्ग करण्यात येणारे पाणी जायकवाडीच्या दिशेने जात असून, त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास मदत होणार आहे. निफाड तालुक्यात शनिवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, विविध धरणांतून पाणी सोडल्याने तालुक्यातील गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे गोदकाठच्या गावांना तहसील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.कोठुरे-करंजगाव वाहतूक बंदनिफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी सायखेडा येथे थांबून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना करण्यासाठी निर्देश दिले. उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. दरम्यान, गोदावरीला पूर आल्याने या पुराचे पाणी कोठुरे बाजूने रस्त्यावर आले. त्यामुळे कोठुरे ते करंजगाव या दरम्यानची वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून दुपारनंतर बंद करण्यात आली होती.गिरणा दुथडी वाहू लागलीलोहोणेर : चणकापूर धरणातून शनिवारी दुपारी गिरणा नदीत ७३०० क्यूसेक व पुनंद धरणातून २३०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे गिरणा नदीचे पात्र दुथडी वाहू लागले आहे. यामुळे देवळा तालुक्यातील विठेवाडी ते सावकी गावादरम्यान असलेल्या गिरणा नदीवरील पुलाला पाणी लागले आहे. पूल पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे गिरणाकाठावरील खामखेडा, सावकी या गावाचा विठेवाडीशी संपर्कतुटण्याची शक्यता आहे. काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
नांदूरमधमेश्वरमधून ८३ हजार क्यूसेक विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 1:25 AM
नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या आठ दरवाजांमधून ८३ हजार ७७३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.
ठळक मुद्देगोदावरीला पूर ; नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशार्