या तलावात काही अज्ञात व्यक्तींकडून विषबाधेचा प्रयोग करण्यात आला असावा, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर माहिती ग्रामपंचायतीला मिळताच, ग्रामपंचायत प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत, सदर घटनेचा पंचनामा केला. याबाबत मत्स्य पालन व्यवसाय नाशिक सहायक आयुक्त अधिकारी, तहसीलदार कार्यालय इगतपुरी, घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना कारवाईसाठी पत्र दिले आहे. दरम्यान, जून, २०२० मध्ये ग्रामपंचायतने स्थानिक पडवळवाडीतील केशव विठल पडवळे यांना मत्स्य व्यवसायासाठी तलाव लिलाव करून पाच वर्षे करारनामा करून दिला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तलावातील मासे मृत होण्याचे प्रमाण वाढत आहे. पाण्यावर पांढऱ्या रंगाचा तवंग जमा झाला असून, त्यामुळे विषबाधा झाल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. केशव पडवळे यांनी स्वखर्चाने तलावाचे दुर्गंधीयुक्त पाणी नाशिक रोड येथील पाणी तपासणी केंद्रात तपासणीसाठी पाठविले आहे.
इन्फो
पाणी न वापरण्याचे आवाहन
सदर दुर्गंधीयुक्त पाणी कोणीही पिण्यासाठी वापरू नये व त्याचा कोणत्याही कामांसाठी वापर करू नये. या पाण्यामुळे ग्रामस्थांचे, तसेच पाळीव प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी सूचना ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना केली आहे. दरम्यान, याबाबतची नुकसान भरपाई देण्याची मागणी केशव पडवळे, गोरख पगारे, जालिंदर पडवळे, बाळकृष्ण भागडे यांनी केली आहे.
फोटो - २५ खेड फिश
खेड येथील लघू पाटबंधारे योजनेतील तलावात आढळून आलेले मृत मासे.
===Photopath===
250521\25nsk_43_25052021_13.jpg
===Caption===
फोटो - २५ खेड फिशखेड येथील लघु पाटबंधारे योजनेतील तलावात आढळून आलेले मृत मासे.