या कक्षाचा लाभ अतिदुर्गम आदिवासी भागातील गुजरात सीमेलगतच्या रुग्णांना होत आहे. शिक्षकांनीही कोरोनाशी दोन हात करण्याची तयारी दर्शविली आहे. कोरोनाला हद्दपार करण्याचा शिक्षकांनी विडा उचलला असून, शिक्षक रस्त्यावरील चौकीवर नाकाबंदी करीत चौकीदार, रखवालदाराची भूमिका बजावण्याबरोबरच लसीकरण, ऑनलाइन नोंदणी, माझे कुटुंब, माझी जबाबदारी आदी विविध भूमिका पार पाडत आहेत.
सध्याच्या कोरोना महामारीच्या भीषण परिस्थितीत तालुक्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजन बेडची गरज ओळखून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे हात मदतीकरिता पुढे सरसावले असून, शिक्षकांच्या भरीव आर्थिक योगदानातून व एकजुटीच्या निर्धारातून तातडीने ७ लाख ६२ हजारांचा निधी जमा करण्यात आला आहे. पैकी चार लाख रकमेतून कोविड रुग्णांकरिता पंचवीस जम्बो सिलिंडर पुणे येथून खरेदी करण्यात आले असून, यामधून ३० ऑक्सिजन
खाटांची सुविधा निर्माण झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात रुग्णांची सोय झाली आहे. उर्वरित रकमेतून आणखी एक सुसज्ज कक्ष तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या निधी संकलनसाठी तहसीलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, साहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, कल्पेश भोये, सुरेश पांडोले, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी संजय कुसाळकर, दिलीप नाईकवाडे आदींसह अनेक शिक्षकांचे सहकार्य लाभले आहे. नेटबँकिंगच्या ऑनलाइन डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून विशेष परिश्रम घेऊन अवघ्या चार दिवसांत हे निधी संकलन केले.
इन्फो
दानशूरांना आवाहन
रुग्णांना वेळीच मदत केल्याने केवळ ऑक्सिजन खाटा इतरत्र शोधण्याकरिता होणारी धावपळ थांबली आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या कृतज्ञ संवेदनशील भावनेने शिक्षकांनी मदतीचा हात पुढे करीत निधी जमा केला आहे .इतर खात्यातील कर्मचारी वर्गाबरोबरच याकामी समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही पुढे येण्याचे आवाहन शिक्षकांकडून करण्यात आले आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे.
फोटो- ०८ सुरगाणा टीचर
सुरगाणा तालुका कोविड जननिधीच्या रकमेचा धनादेश तहसीलदार किशोर मराठे यांना सुपुर्द करण्यात आला. यावेळी उपस्थित नायब तहसीलदार सुरेश बकरे, खैरनार, जि. प. सदस्य ज्योती जाधव आदींसह गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी व शिक्षक बांधव.
===Photopath===
080521\08nsk_11_08052021_13.jpg
===Caption===
फोटो- ०८ सुरगाणा टीचर सुरगाणा तालुका कोविड जन निधीच्या रकमेचा धनादेश तहसिलदार किशोर मराठे यांना सुपूर्द करण्यात आला.यावेळी उपस्थित नायब तहसीलदार सुरेश बकरे, खैरनार, जि.प.सदस्य ज्योती जाधव आदींसह गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी व शिक्षक बांधव.