नाशिक : पंतप्रधानांनी नवीन योजना सुरू केल्याचे सांगत एटीएम नंबर व पिनकोडची माहिती घेत बँक खात्यातून ३० हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार सिडको परिसरात घडला आहे़ कामटवाडा येथील कमलनगरमधील अभिजित पार्क येथील रहिवासी संजय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ७ एप्रिल रोजी सायंकाळी ०९५३४२९०२५४ या क्रमांकावरून फोन आला़ त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन योजना सुरू केली असून त्यासाठी एटीएम व आधारकार्ड नंबर मागितला़ त्यानुसार माहिती घेऊन पाटील यांच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यातून एकदा २० व त्यानंतर १० असे तीस हजार रुपये काढून घेतले़या प्रकरणी कामटवाडा येथील संजय पाटील यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे़
एटीएमनंबर, पिनकोड घेऊन हजारोंची फसवणूक
By admin | Published: April 20, 2017 6:01 PM