नांदूरशिंगोटे : म्हाळुंगी नदीवर असलेला व तीन गावातील शेतकºयांसाठी वरदान ठरलेला नळवाडी येथील बंधारा गेल्यावर्षीच्या पुरात वाहून गेला होता. वर्षभरानंतरही त्याची दुरुस्ती न झाल्याने म्हाळुंगी नदीचे पाणी वाहून जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.म्हाळुंगी नदीवर नळवाडी शिवारात असलेल्या या बंधाºयाचा फायदा परिसरातील तीन गावांना होतो. नळवाडी, चास व कासारवाडी येथील शेतकºयांना या बंधाºयातील पाण्याचा फायदा होतो. पाण्याची पातळी लवकर कमी होत नाही. मात्र आता पाणी वाहून जात असल्याने शेतकºयांना उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागेल.गेल्यावर्षी जलयुक्त शिवार योजनेतून या बंधाºयांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर चार ते पाच दिवसातच म्हाळुंगी नदीला पूर आल्यानंतर बंधारा वाहून गेला होता.
बंधाºयातून वाहून गेले हजारो लिटर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:03 AM