नाशिक : बॅँकांमध्ये रोकड पोहचविणाºया कंपनीच्या एका माजी कर्मचाºयाने कट रचून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने उंटवाडी सिग्नलच्या परिसरात भरदिवसा वीस लाखांची रोकड लुटल्याची घटना २८ मे रोजी घडली होती. या घटनेतील संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये बारावीच्या वर्गात शिकणाºया विद्यार्थ्याचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.ब्रिंक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीचे कर्मचारी अक्षय बागुल, विशाल निकुंभ हे उंटवाडी परिसरातील एका व्यावसायिकाकडे पैशांच्या वसुलीसाठी आले होते. पैसे घेऊन ते दुचाकीवरून परतणार तोच दुचाकीवरून तिघा संशयित त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून जवळील एका गल्लीमध्ये नेले. त्याठिकाणी एका संशयिताने एअर पिस्तूल काढून ती बागुलच्या दिशेने रोखली आणि त्यांच्याकडील २० लाख ४५ हजार ३९८ रु पयांची रोकड असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेत मारहाण करून पोबारा केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा तपास गंगापूर पोलीस व गुन्हे शाखा युनिट एकचे पथक संयुक्तरीत्या करत होते.सदरची घटना घडली त्यावेळी घटनास्थळावरून पोलिसांना भक्कम असा सुगावा हाती लागलेला नव्हता व ज्या गल्लीमध्ये रोकड पिस्तूलचा धाक दाखवून लुटली त्या भागात कुठल्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते, असे आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.कंपनी सोडून गेलेला कामगार आतिष उत्तम कराटे (२३) याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली असता त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखविल्यानंतर त्याने संशयित जितेंद्र रवींद्र शेटे (२२), सनी मन्सूर शेख (२४), शुभम हिराशंकर यादव (२१), प्रशांत काशीनाथ कानडे (२४) व एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे कबुली दिली. पोलिसांनी या सर्व संशयितांना तत्काळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलीस कोठडी दरम्यान, रोकड लुटीच्या दरोड्यामधील एकूण १४ लाखांची रोकड, दोन दुचाकी, एअर पिस्तूल, मोबाइल असा सुमारे १५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पाचही संशयितांना येत्या ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.अशी फिरली तपासचक्रेकंपनीच्या काही कर्मचाºयांकडे चौकशी करून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. कंपनीच्या कार्याची संपूर्ण माहितीची जाण असलेल्या व्यक्तीचा यामध्ये सहभागाचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी कंपनी सोडून गेलेल्या काही कर्मचाºयांची चौकशी सुरू केली.
वीस लाख लुटणाऱ्या संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 1:20 AM
नाशिक : बॅँकांमध्ये रोकड पोहचविणाºया कंपनीच्या एका माजी कर्मचाºयाने कट रचून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने उंटवाडी सिग्नलच्या परिसरात भरदिवसा वीस लाखांची रोकड लुटल्याची घटना २८ मे रोजी घडली होती. या घटनेतील संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये बारावीच्या वर्गात शिकणाºया विद्यार्थ्याचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठळक मुद्देमाजी कर्मचारी मुख्य सूत्रधार बारावीच्या विद्यार्थ्याचा गुन्ह्यात सहभाग