नाशिक : शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ५८ हजार ८७५ ठिकाणी डास उत्पत्ती स्थाने आढळली असून, त्यातील १४ हजार ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत, तर विविध ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळल्याने १०९ नागरिकांना दंड करण्यात आला आहे. आयुक्तांनी डेंग्यू संदर्भात नियुक्त केलेल्या कोअर टीमने आणि आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागांत भेटी देऊन तपासणीबरोबरच कारवाई करण्यात आली आहे.शहरात आॅगस्ट महिन्यापासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढू लागली आणि आता डिसेंबर महिना उजाडला तरी रुग्ण संख्या वाढतच आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ६८ रुग्ण आढळले आहेत, तर जानेवारीपासून आत्तापर्यंत ९३९ रुग्ण आढळले आहे. आॅगस्ट महिन्यानंतर ज्या गतीने रुग्णांची संख्या वाढली आहे. ते बघता यंदा हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळण्याची शक्यता आहे.महापालिकेने यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक आढळली असून, ५८ हजार ८७५ डास उत्पत्ती स्थाने आढळली आहेत. यात १ हजार ४५१ ठिकाणी डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे सोडण्यात आले आहेत, तर आत्तापर्यंत १४ हजार ३९१ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत.एकाच दिवसात केलेली कारवाईबुधवारी (दि.११) एकाच दिवशी ६ हजार २९६ घरे तपासण्यात आली. त्यात ३५ ठिकाणी डासांची उत्पत्ती स्थाने आढळली आहेत. त्यातील पंचवीस पाण्याचे कंटेनर रिकामे करण्यात आले आहेत, तर उर्वरित ठिकाणी अळीनाशक फवारणी करण्यात आली आहे. एकाच दिवसात २,७०१ ठिकाणी फवारणी करण्यात आली आहे.वैद्यकीय व्यावसायिकांचा व्हॉट््सअॅप गु्रपडेंग्यूचे उपचार होणाºया रु ग्णालयाचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवण्यात आला असून, त्या माध्यमातून सर्व संबंधित डॉक्टरांकडून माहिती संकलित करणे, शासकीय मार्गदर्शक सूचना देणे, माहिती देणे, समन्वय साधण्याचे काम केले जात आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते आणि प्रभारी जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी बुधवारी विविध भागांत घरभेटी देताना दत्तजयंतीचे निमित्त साधून दत्तमंदिर असलेल्या सोसायट्यांच्या ठिकाणी भाविकांतदेखील जागृती केली.
शहरात आढळली ५८ हजार डास उत्पत्ती स्थाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 1:57 AM
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ५८ हजार ८७५ ठिकाणी डास उत्पत्ती स्थाने आढळली असून, त्यातील १४ हजार ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत, तर विविध ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळल्याने १०९ नागरिकांना दंड करण्यात आला आहे. आयुक्तांनी डेंग्यू संदर्भात नियुक्त केलेल्या कोअर टीमने आणि आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागांत भेटी देऊन तपासणीबरोबरच कारवाई करण्यात आली आहे.
ठळक मुद्देमनपाकडून कार्यवाही सुरू : नोडल अधिकाऱ्यांच्या भेटी