येवला : ह्यमहावितरणकडून सततच्या भारनियमनामुळे व वीज पुरवठा खंडित केल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊन जिल्ह्यातील हजारो हेक्टर कांदा पाण्याअभावी जळून गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे शंभर टक्के आर्थिक उत्पन्न बुडत असल्याचा आरोप होताना नाशिक जिल्ह्यात बघावयास मिळत आहे,ह्ण असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले.तालुक्यातील ठाणगाव येथे रामदास हरिभाऊ गरुडे व सागर शेळके यांच्या शेतात भेटीप्रसंगी दिघोळे शेतकरी वर्गाशी संवाद साधताना बोलत होते. दोनच दिवसांपूर्वी गरुडे यांनी स्वतःच्या शेतातील साडेतीन एकर कांदा पाण्याअभावी जळून गेल्याने ट्रॅक्टरने नांगरून टाकला तर सागर शेळके यांनी आपला कांदा जाळून टाकला होता. या शेतकऱ्यांच्या शेतास दिघोळे यांनी भेट देऊन पाहणी केली.कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशांमध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जीवावरती शेती व्यवसाय करण्याचे जरी ठरवले तरी आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतीतून शाश्वत नफा तर दूरच; परंतु उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. देशात शेतमाल सोडून सर्वच गोष्टींचे बाजारभाव वाढलेले असताना कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात कांद्याची सूत्र पूर्णपणे राज्यकर्त्यांच्या हातात गेले आहे. आता याच राज्यकर्त्यांनी कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शीघ्र गतीने कृती करावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी विरोधी राज्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये धडा शिकवू, असेही दिघोळे शेवटी म्हणाले.याप्रसंगी रवींद्र शेळके, नितीन शेळके, मोहन शेळके, गणपत भवर, महेश शेळके, सागर बोराडे, संपतराव शेळके, रमेश शेळके, राजू शेळके, नवनाथ कोंढरे, किशोर शेळके, किशोर कोंढरे, हृषीकेश भवर, माधव शेळके, प्रमोद भवर, तुषार शेळके, समाधान शेळके, भूषण भवर आदी शेतकरी उपस्थित होते.
हजारो हेक्टर कांदा पाण्याअभावी जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 6:28 PM
येवला : ह्यमहावितरणकडून सततच्या भारनियमनामुळे व वीज पुरवठा खंडित केल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊन जिल्ह्यातील हजारो हेक्टर कांदा ...
ठळक मुद्देभारत दिघोळे : येवल्यातील ठाणगावी शेतकऱ्यांशी संवाद