सुयोग जोशी,नाशिक : नाशिक येथील शिवतीर्थ येथून हजारो मराठा समाज बांधव शेकडो वाहनांच्या ताफ्यासह मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुधवारी सकाळी पुण्याकडे रवाना झाले.
सकाळी नऊ वाजता नाशिकमधील सर्व समाज बांधव छत्रपती शिवरायांचे शिवस्मारक सीबीएस येथे एकत्रित येत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. रॅलीची सुरुवात शिवस्मारक ते मुंबई नाका या ठिकाणापर्यंत पायी रॅली काढल्यानंतर शेकडो वाहनांनी हा मोर्चा नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पुढे मार्गस्थ झाले. यावेळी आंदोलक नानासाहेब बच्छाव यांनी नाशिकमधून हजारो किलोचे तांदळाचे कट्टे, शेकडो लिटर तेलाचे डबे, डाळ,शेंगदाणे यांसह अन्य अन्नधान्याची रसद घेऊन पुण्याकडे रवाना होत असल्याचे सांगितले.
नाशिकमधून निघालेल्या रॅलीमध्ये शिवाजी सहाणे, चंद्रकांत बनकर, सुनील बागुल,राजू देसले,नितीन रोटे पाटील,आशिष हिरे, डॉ. सचिन देवरे, योगेश नाटकर व्यंकटेश मोरे,सोमनाथ जाधव, मामा राजवाडे,अजय बागुल, निलेश मोरे,सचिन पवार, संजय पडवळ, राम पाटील,वैभव दळव, उल्हास बोरसे,कैलास खांडबहाले, एकता खैरे, शिल्पा चव्हाण,ममता शिंदे,पुंडलिक बोडके, ज्ञानेश्वर कवडे,निलेश ठुबे, ज्ञानेश्वर सुराशे, संदीप कुटे ,राम निकम,प्रफुल वाघ, अजित नाले,विक्रांत देशमुख, अमित नडगे, भारत पिंगळे,कृष्णा महाराज धोंडगे, बालाजी धोंडगे बाळासाहेब लांबे सहभागी झाले होते.