पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सरासरीपेक्षा खूपच खाली आल्याने केलेला खर्चही फिटेनासा झाल्याने अनेक शेतकर्यांनी विक्र ीसाठी तयार असलेला कांदा शेतातच पोळी लावून ठेवला असल्याने कांद्याचा शेतात मुक्काम वाढला आहे. जर हा कांदा शेतात जास्त दिवस राहिल्यास सडण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.यंदा प्रतिकूल हवामानामुळे सर्वच पिके चांगली आली आहे. मात्र त्यांना मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गाची आर्थिक कोंडी होत आहे. कांद्याचेही भरमसाठ पिक आले आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून कांदा सरासरी तीनशे ते चारशे रु पयांच्या पुढे सरकत नसल्याने तसेच बाजारातही कांद्याची जास्त आवक होत असल्याने अनेक शेतकर्यांनी विक्र ीसाठी तयार असलेला हजारो क्विटल कांदा हा शेतात पोळी लावून त्यावर कांदा पात टाकून झाकून ठेवलेला आहे. रांगडा कांदा हा टिकाऊ नसल्याने व सध्या कडक उन्हाळा लागला असून प्रचंड उकाडा जाणवत असल्याने हा साठवून ठेवलेला कांदा सडण्याची जास्त शक्यता आहे. कांदा विक्र ीस नेल्यास अत्यल्प भावामुळे शेतकर्यांचा खर्चही फिटत नाही. अन कांदा शेतात साठवून ठेवल्यास सडण्याची भीती असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. धरल तर चावतय व सोडल तर पळतंय अशी केविलवाणी अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे.पोळ व रांगडा कांद्याची टिकवण क्षमता हि खूपच कमी असते त्यामुळे हा कांदा विकणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र मातीमोल भावामुळे मजुरी व वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकर्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शासनाने कांदा पिकास दोन हजार रु पये हमी भाव द्यावा.- प्रभाकर बोरनारे, शेतकरी, पाटोदा.
पाटोदा परिसरात हजारो क्विंटल कांदा शेतात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 9:41 PM
पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सरासरीपेक्षा खूपच खाली आल्याने केलेला खर्चही फिटेनासा झाल्याने अनेक शेतकर्यांनी विक्र ीसाठी तयार असलेला कांदा शेतातच पोळी लावून ठेवला असल्याने कांद्याचा शेतात मुक्काम वाढला आहे. जर हा कांदा शेतात जास्त दिवस राहिल्यास सडण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्दे कांदा सडण्याची भीती शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण